Medicines

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! धोकादायक 14 फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी

547 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने 14 औषधांवर बंदी घातली आहे. डीजीसीआय (DCGI) म्हणजेच भारतीय औषध नियामक मंडळाने (Drugs Controller General of India) हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी, 3 जून रोजी हा निर्णय घेतला आहे.

भारताकडून 14 औषधांवर बंदी
भारत सरकारने 14 प्रकारच्या फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDC – Fixed Dose Medicine) औषधांवर बंदी (Ban) घातली आहे. या औषधांचा संबंधित रोगांवर होणारा परिणाम आणि उपचारात्मकतेबाबत स्पष्टता आढळून आल्याने डीसीजीआयने या औषधांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलत 14 प्रकारच्या FDC कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घातली आहे.

फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषध म्हणजे काय?
दोन किंवा अधिक घटक एकाच औषधात एकत्र मिसळलेले असणे म्हणजे फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDC – Fixed Dose Medicine) होय. यामध्ये Nimesulide + Paracetamol dispersible गोळ्या आणि Pholcodine + Promethazine या सारख्या घटकांचा समावेश आहे.

डीजीसीआयच्या मागणीनंतर केंद्राचं मोठं पाऊल
या औषधांच्या उपचाराबाबत कंपनीला स्पष्टीकरण नसल्याने या औषधांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच या औषधांमुळे आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे डीसीजीआयच्या तज्ज्ञ समितीला आढळून आल्याने ही बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

Share This News

Related Post

Suspension of MP

Suspension of MP : सभापतींनी विरोधी पक्षाच्या 15 खासदारांचं केलं निलंबन

Posted by - December 14, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेतील 15 खासदारांचं निलंबन (Suspension of MP) करण्यात आलं आहे. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्यामुळे त्यांच्यावर…

अंत्योदय योजना : लाभार्थ्यांना धान्य घेण्याचे आवाहन

Posted by - October 3, 2022 0
पुणे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत अंत्योदय योजना तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय अन्न…

“धनुष्यबाण हे शिवसेनेच चिन्ह आहे ,अशाप्रकारे एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणे योग्य नाही”… शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला

Posted by - August 10, 2022 0
मुंबई : शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या वादंगावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केल आहे .…
CM EKNATH SHINDE

CM Eknath Shinde : अजित पवारांच्या बंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकिय भूकंप पाहायला मिळाला. यावेळी शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. यामध्ये…

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्र आढावा बैठक संपन्न ; औद्योगिक क्षेत्रात त्वरित ट्रक टर्मिनलची सुविधा करा-उद्योगमंत्री

Posted by - October 19, 2022 0
पुणे : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत तळेगाव येथील जलप्रक्रिया केंद्र कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *