बालासोर जिल्ह्यात कोरोमंडल आणि दुरांतो एक्स्प्रेसची समोरासमोर टक्कर

455 0

ओडिशातील बलसोरपासून सुमारे 40 किमी अंतरावर या ट्रेनची मालगाडीसोबत टक्कर झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात ट्रेनचे काही डब्बे रुळावरुन घसरले आहेत. या घटनेत 900 प्रवासी जखमी झाले आहेत तर 200 हुन अधिक जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. भारतातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी एकाच मार्गावर आल्याने हा अपघात झाला. रेल्वे ट्रॅकवर सिग्नल खराब झाल्याने दोन्ही गाड्या एकाच रुळावर आदळल्याची प्राथमिक माहिती आहे. ही ट्रेन दुपारी 3.15 वाजता शालीमार स्टेशनवरून निघाली. बालासोर, ओडिशापासून 40 किलोमीटर दूर, बहनगा स्टेशनजवळ मालगाडीला धडकली आणि रुळावरून घसरली.आतापर्यंत 50 हून अधिक प्रवाशांना बहनगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे रुळावरून घसरल्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

Share This News

Related Post

‘काही दिवसात सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि संजय राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री’, मनसेची टीका

Posted by - May 31, 2022 0
मुंबई- सुप्रिया सुळे उस्मानाबादच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे असे साकडे तुळजापूरच्या भवानीदेवीकडे मागितल्याचे…

PMPML कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनात वाढ होणार – प्रमोद (नाना) भानगिरे

Posted by - December 26, 2022 0
पुणे : PMPML चे कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. महापालिकेच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगानुसार डिसेंबर महिन्याच्या वेतनात…

मोठी बातमी ! पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted by - April 20, 2022 0
पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो प्रकल्पास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.…

शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार अनिल भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळला

Posted by - January 2, 2023 0
पुणे : आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांनी वैद्यकीय उपचारासाठी तात्पुरता जामीनाचा अर्ज केला होता. आज विशेष न्यायालयाने हा अर्ज फेटाळून…

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं बनावट फेसबुक अकाऊंट

Posted by - May 2, 2023 0
पुणे शहरात ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आता तर पुण्याचे जिल्हाधिकारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *