भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने सिंगापूरमध्ये जिंकले सुवर्णपदक

124 0

सिंगापूर- ऑलिम्पिक पदक विजेती आणि भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने आज सिंगापूर वेटलिफ्टिंग इंटरनॅशनल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या यशामुळे ती राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

चानू प्रथमच 55 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत सहभागी झाली आहे. या स्पर्धेत तिने 191 किलो (86 किलो आणि 105 किलो) वजन उचलले. तिला कोणत्याही खेळाडूकडून आव्हान मिळाले नाही. मीराबाईनंतर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाची जेसिका सेवास्टेन्को आहे. जेसिकाने मीबराबाई खालोखाल 167 किलो (77 किलो आणि 90 किलो) वजन उचलले. त्यानंतर मलेशियाच्या अ‍ॅली कॅसांड्रा एंजेलबर्टने 165 किलो (75 किलो आणि 90 किलो) वजनासह तिसरे स्थान पटकावले.

मागच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकून मीराबाईने इतिहास रचला आहे. मीराबाईच्या या यशामुळे भारताचा वेटलिफ्टिंगमधील पदकाची 21 वर्षांची प्रतीक्षा संपली. मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात हे पदक जिंकले होते. मीराबाईने स्नॅच अँड क्लीन अँड जर्क फेऱ्यांमध्ये एकूण 202 किलो वजन उचलून हे पदक जिंकले होते.

दरम्यान, टोकियो स्पर्धेनंतर आता ही पहिलीच स्पर्धा आहे. ऑलिम्पिकनंतर तिने डिसेंबरमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार घेतली होती. 27 वर्षीय चानू कॉमनवेल्थ रँकिंगच्या आधारे 49 किलो वजनी गटात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. मात्र, भारताला आणखी सुवर्णपदके मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी चानूने 55 किलो वजनी गटात भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंगापूर वेटलिफ्टिंग आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही यावर्षी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा आहे. या स्पर्धेत प्रत्येक वजन गटातील अव्वल आठ वेटलिफ्टर्स थेट राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.

Share This News

Related Post

Odisha Train Accsident

Odisha Train Accident : ओडिसा रेल्वे अपघातप्रकरणाला वेगळे वळण ? CBI चौकशीनंतर ज्युनिअर इंजिनिअर कुटुंबासह बेपत्ता

Posted by - June 20, 2023 0
ओडिसातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातला (Odisha Train Accident) वेगळे वळण लागले आहे. या घटनेशी संबंधित एक सिग्नल ज्युनिअर…

ACB TRAP : पिंपरी चिंचवड महापालिकेचा कर्मचारी ACB च्या जाळ्यात ; 2 लाखांपेक्षा अधिक रकमेच्या लाचेची मागणी

Posted by - August 3, 2022 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील सर्व लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला आहे .…
Ratnagiri Crime

धक्कादायक ! रत्नागिरीमध्ये नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 20, 2023 0
रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.…
Mansoon Session

Monsoon Session : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून; ‘या’ 4 मुद्द्यांमुळे पावसाळी अधिवेशन ठरणारं वादळी

Posted by - July 16, 2023 0
मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) 17 जुलैपासून सुरुवात होत असून या अधिवेशनाकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. अजित पवार…

औरंगाबादमध्ये 9 मेपर्यंत जमावबंदी ! राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का ?

Posted by - April 26, 2022 0
औरंगाबाद- औरंगाबादमध्ये आजपासून 9 मे पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *