LPG Gas

गॅस सिलिंडरच्या दरात बदल! ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त झाला सिलेंडर

702 0

मुंबई : सगळीकडे महागाई (Inflation) वाढल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे बजेट (Budget) ढासळत आहे. त्यातच आता सर्वसामान्य लोकांना थोडासा दिलासा मिळणारी बातमी समोर आली आहे. दर महिन्याच्या सुरुवातीला LPG गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) दरात बदल होत असतात. आजपासून नवे दर लागू होणार आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 83 रूपये 50 पैशांची कपात झाली असून घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नाही. यापूर्वी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅसच्या किमतींत 172 रुपयांनी कपात करण्यात आली होती. नवी दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत 83.5 रुपयांनी कमी झाली असून ती आता 1 हजार 773 रुपयांवर पोहोचली आहे. तर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1 हजार 103 रुपये आहे तेवढाच आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये आहे. कोलकात्यात 1129 रुपये, मुंबईत 1102.5 रुपये, चेन्नईमध्ये 1118.5 रुपये, भोपाळमध्ये 1108.5 रुपये, जयपूरमध्ये 1106.5 रुपये, इंदूरमध्ये 1131 रुपये, अहमदाबादमध्ये 1110 रुपये आणि लखनऊमध्ये 1140.5 रुपये आहे.

Share This News

Related Post

PUNE CRIME : ‘तुझा माज उतरवतो…!’ रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला ; लोहियानगरमधील घटना

Posted by - January 16, 2023 0
पुणे : सध्या पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत असताना लोहियानगरच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर शनिवारी रात्री रिक्षाचालकावर चार रेकॉर्डवरील आरोपींनी रिक्षा चालकावर…

पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात

Posted by - June 7, 2022 0
पुणे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२२ साठी प्रशासनाने आवश्यक नियोजन…

“तुमची हिम्मत कशी झाली माझा फोन रेकॉर्ड करण्याची…” खासदार नवनीत राणांचा पोलीस स्टेशनमध्ये राडा ; पहा व्हिडिओ

Posted by - September 7, 2022 0
अमरावती : खासदार नवनीत राणा आज अमरावतीच्या पोलिसांवर चांगल्याच कडाडल्या आहेत. विषय होता लव्ह जिहाद प्रकरणातून एका मुलीचं झालेलं अपहरण…

नाकाला जीभ लावणारे पुणेरी काका ! तब्बल 90 मिनिटं नाकाला लावून ठेवली जीभ… व्हिडीओ व्हायरल

Posted by - January 15, 2023 0
तुमची जीभ तुमच्या नाकाला लागते का ? नाही ना ! पण पुण्यातल्या एका अवलियाची जीभ त्याच्या नाकाला लागते बरं का…

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा लवकरच अडकणार लग्नबंधनात ? चर्चांना उधाण

Posted by - March 31, 2023 0
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचे नाव आम आदमी पक्षाचा खासदार राघव चड्ढा याच्यासोबत जोडले जात आहे. परिणीती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *