accident

बाजारातून घरी जात असताना टिप्परखाली येऊन शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू

4642 0

गोंदिया : सध्या राज्यात अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. अशीच एक अपघाताची (Accident) घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोड्यात घडली आहे. यामध्ये अपघातात एका शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. टिप्परने दिलेल्या धडकेत या शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागला आहे.

काय घडले नेमके?
गोंदिया जिल्ह्याचा तिरोडा शहरातील शहीद मिश्रा शाळेजवळ हा अपघात झाला आहे. दुपारच्या सुमारास वाळू वाहून नेणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने स्कूटर चालवणाऱ्या महिला शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला आहे. येवांगणा कुंभलकर असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्या बाजारातून घरी जात असताना हा अपघात झाला आहे.

येवांगणा कुंभलकर (Yewangana Kumbhalkar) या सरांडी गावात प्रगती प्राथमिक आश्रम शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात तिरोडा येथे पाठवण्यात आला. या अपघाताचा पुढील तपास तिरोडा पोलीस (Tiroda Police) करीत आहे.

Share This News

Related Post

ग्रामीण भागात हेलिपॅड ठीकंय, पण…; मुख्यमंत्र्यांच्याच गावाजवळ शिक्षणाच्या प्रश्नाची कोर्टाने घेतली दखल

Posted by - July 14, 2022 0
मुंबई : खिरखंड या गावाजवळच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव आहे आणि त्या गावात चांगले रस्ते, रुग्णालय, शाळा नाही. पण…
Crime

Ahmednagar Crime : अहमदनगर हादरलं ! रंगपंचमीच्या दिवशी पतीने पत्नीसह 2 मुलींना जिंवत जाळलं

Posted by - March 25, 2024 0
अहमदनगर : आज सगळीकडे मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी होताना दिसत आहे. मात्र यादरम्यान अहमदनगर जिल्ह्यातून (Ahmednagar Crime) एक धक्कादायक घटना…

पुण्यातील एनडीएमध्ये दाखल झालेल्या छात्राचा संशयास्पद मृत्यू

Posted by - February 10, 2022 0
पुणे- देशसेवेचे स्वप्न घेऊन पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, एनडीएमध्ये दाखल झालेल्या छात्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा…

फाल्गुन महिना 2023 : हा मराठी महिना आहे विशेष, फाल्गुन महिन्यात श्रीकृष्णाची पूजा केल्याने साधकांना मिळतो विशेष लाभ

Posted by - February 6, 2023 0
फाल्गुन महिना 2023 : हिंदू कॅलेंडरचा शेवटचा महिना म्हणजेच फाल्गुन महिना आजपासून म्हणजेच 06 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. फाल्गुन महिन्यात…
RASHIBHAVISHY

वृषभ राशीला आज एखादा नवीन श्रीकृष्णा सारखा मित्र भेटणार आहे; वाचा तुमचे राशिभविष्य

Posted by - December 26, 2022 0
मेष रास : आज तुमच्या दानी वृत्तीवर थोडा अंकुश ठेवा. परमेश्वराने दिलेल्या दहा टक्के भाग जरी दान केला तरीही पुण्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *