Eknath Shinde And Devendra Fadanvis

अडीच लाखात मिळणार हक्काचं घर; राज्य सरकारकडून झोपडीधारकांना मोठे गिफ्ट

599 0

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका (Mumbai Municipal Elections) तोंडावर आल्याने राज्य सरकारकडून आज एक मोठा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या काळातील झोपडीधारकांना (Slum Area) मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतील झोपडीच्या बदल्यात झोपडीधारकांना सशुल्क घर मिळणार आहे. या निर्णयामुळे लाखो झोपडीधारकांना याचा फायदा होणार आहे.

काय आहे नेमका निर्णय ?
राज्य सरकारने याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार, मुंबईत झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार आहे. झोपडीच्या बदल्यात अवघ्या 2 लाख 50 हजार रुपयांत घर मिळणार आहे. शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. शासन निर्णय जारी झाल्याने लाखो झोपडपट्टीवासियांच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.

यासाठी काय आहेत अटी?
राज्य जारी केलेल्या निर्णयानुसार, या नव्या योजनेतील लाभार्थी झोपडपट्टीवासियांच्या अटी आणि शर्थी निश्चित करण्यासाठीची जबाबदारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे.

Share This News

Related Post

Gadchiroli News

Gadchiroli News : गडचिरोलीमधील ‘त्या’ हत्येचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश

Posted by - October 15, 2023 0
गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli News) जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील दवंडी गावातील एका किराणा दुकानदाराची निर्घृण हत्या केल्याची घटना 11 ऑक्टोबर रोजी…
Rikshaw

सहकार नगरमधील मुक्तांगण शाळेशेजारी रिक्षावर झाड कोसळले; महिलेचा मृत्यू

Posted by - June 12, 2023 0
पुणे : पुण्यातील सहकार नगर, मुक्तांगण शाळेशेजारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये एका रिक्षावर मोठे झाड कोसळल्यामुळे एका महिलेला…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा संपन्न

Posted by - March 12, 2023 0
  पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिनांक ११ व १२ मार्च २०२३ रोजी विद्यापीठाची अधिसभा संपन्न झाली. या अधिसभेत विद्यार्थी…
anil Ramod

रामोड कुटुंबीयांच्या खात्यात 47 लाखापेक्षा जास्त रक्कम; CBI तपासात आले समोर

Posted by - June 14, 2023 0
पुणे : पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड (Dr. Anil Ramod) व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने असलेल्या 17 बँक खात्यांमध्ये…

सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला; आज न्यायालयात काय घडले ? वाचा सविस्तर

Posted by - January 10, 2023 0
नवी दिल्ली : शिवसेनेतील मोठ्या बंडखोरीनंतर सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षाचे प्रकरण अद्याप देखील प्रलंबित आहे. या प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *