Virat Kohli

कोहलीची ‘विराट’ कामगिरी! ‘हा’ विक्रम करणारा पहिला आशियाई व्यक्ती

634 0

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. विराट कोहली इंस्टाग्रामवर 250 दशलक्ष फॉलोअर्स (Instagram Followers) पार करणारा पहिला आशियाई व्यक्ती (First Asian to Reach 250 Millions Followers) बनला आहे. फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर (Cristiano Ronaldo) हा विक्रम करणारा विराट कोहली तिसरा खेळाडू बनला आहे.

‘हा’ विक्रम करणारा पहिला आशियाई
विराट कोहली सध्या 34 वर्षांचा आहे. कोहलीनं यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये हंगामात म्हणजेच आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये दोन शतकं ठोकली. तसेच कोहलीनं आयपीएलमध्ये सर्वाधिक आठ शतकं ठोकण्याचा विक्रमही स्वत:च्या नावे केला आहे. कोहलीच्या या कामगिरीमुळे त्याच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. विराट कोहली इंस्टाग्रामवर 250 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय आणि आशियाई बनला आहे.

विराट कोहलीनंतर भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाचा कर्णधार एमएस धोनी 42.2 दशलक्ष फॉलोअर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर आहे. सचिन तेंडुलकरचे इंस्टाग्रामवर 40.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Share This News

Related Post

B.Sai Praneeth

B.Sai Praneeth : वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटनपटू बी साई प्रणीतची तडकाफडकी निवृत्ती

Posted by - March 5, 2024 0
मुंबई : क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड चॅम्पियन मेडलिस्ट खेळाडू बी साई प्रणीतने (B. Sai Praneeth)…
Kantara 2 First Look

Kantara 2 First Look : ऋषभ शेट्टींच्या ‘कांतारा 2’चा फर्स्ट लूक व्हायरल

Posted by - November 27, 2023 0
मुंबई : देशात सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘कांतारा’ या सिनेमाची जादू आजही प्रेक्षकांवर आहे. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत कांताराच्या दमदार…
IPL

IPL 2024 : आयपीएल 2024 चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी रंगणार पहिला सामना

Posted by - February 22, 2024 0
मुंबई : इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2024) चं वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणूकची तारीख लक्षात घेऊन आयपीएलच्या…
Subhedaar Movie Teaser

Subhedaar Movie Teaser : शिवराज अष्टकातील पाचवे अष्टक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ओम राऊतच्या तान्हाजीला देणार टक्कर ?

Posted by - June 21, 2023 0
मुंबई : सध्या मराठी चित्रपट सृष्टीत शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीवर आधारित सिनेमांचा (Subhedaar Movie Teaser) धडाका लागला आहे. हिंदी आणि मराठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *