Ray Stetvson

‘RRR’ फेम अभिनेते रे स्टीव्हनसन यांचे निधन

460 0

मुंबई : ‘गंदी बात’ फेम अभिनेता आदित्य सिंह राजपूतच्या मृत्यूची बातमी ताजी असताना आता मनोरंजनसृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. हॉलिवूडचे (Hollywood) प्रसिद्ध अभिनेते रे स्टीव्हनसन (Ray Stevenson) यांचे वयाच्या 58 व्या वर्षी निधन (Pass Away) झाले आहे. आयरिश वंशाचा अभिनेता शेवटचा एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात दिसला होता. धक्कादायक म्हणजे दोन दिवसांनी, म्हणजेच 25 मे रोजी रे यांचा वाढदिवस होता. रे स्टीव्हनसन यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

रे स्टीव्हनसन यांचा ‘RRR’ हा कारकिर्दीतील पहिला भारतीय चित्रपट होता. रे यांचा जन्म 25 मे 1964 रोजी उत्तर आयर्लंडमध्ये झाला होता. त्यांचे वडील पायलट होते आणि वयाच्या 8 व्या वर्षी ते कुटुंबासह इंग्लंडला गेले होते. रे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. ‘पनीशर: वॉर जान’, ‘द थिअरी ऑफ फ्लाइट’, ‘किंग आर्थर’ या चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यासोबतच ते ‘द वॉकिंग डेड’, ‘स्टार वॉर्स’, ‘वायकिंग्स’, ‘ब्लॅक सेल्स’, ‘डेक्स्टर’ सारख्या शोमध्ये त्यांनी काम केले आहे. 1998 मध्ये आलेल्या ‘थ्योरी ऑफ फ्लाईट’ या चित्रपटाद्वारे त्यांना मोठ्या पडद्यावर पहिला ब्रेक मिळाला होता.

Share This News

Related Post

Mahayuti Seat Sharing

Mahayuti Seat Sharing : ‘या’ 4 जागांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली; अजूनही तोडगा निघेना

Posted by - March 23, 2024 0
मुंबई : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक (Mahayuti Seat Sharing) आयोगाकडून अधिसूचना जारी होऊनही राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागा…

NCP MLA Disqualification Result : राष्ट्रवादी कुणाची? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून निकाल वाचनाला सुरुवात

Posted by - February 15, 2024 0
मुंबई : शिवसेनेच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही (NCP MLA Disqualification Result) विचार केला जाणार आहे. दोन्ही…
Jaya Prada

Jaya Prada : ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा यांना फरार म्हणून घोषित

Posted by - February 27, 2024 0
मुंबई : प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा (Jaya Prada) यांना कोर्टाने फरार जाहीर केलं आहे. जया…
Mumbai Crime News

Mumbai Crime News :काजलचे घराबाहेर सूत जुळलं अन् सासू-नवऱ्याचा केला गेम; पण…

Posted by - October 19, 2023 0
मुंबई : आजकाल पैसा हाती आला कि रक्ताची नातीदेखील एकमेकांच्या जीवावर (Mumbai Crime News) उठतात. याच पैशांपायी गडचिरोलीमध्ये एका सुनेनं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *