Accsident

पुण्यातील उंड्री रोडवर बसचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात

596 0

पुणे : पुणेमध्ये बसचा ब्रेक फेल झाल्याने शहरात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे शहरात एन आय बी एम उंड्री रोडवर (NIBM Undry Road) हा अपघात (Accident) झाला आहे. एन आय बी एम उंड्री रोडवर उताराला अचानक एका बसचा ब्रेक फेल (brake failure) झाला. त्यामुळं या बसने दुचाकी, रिक्षा आणि बीएमडब्ल्यू कारसह अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातातील जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय घडले नेमके ?
कोंढवा परिसरातील असणाऱ्या एनआयबीएम रस्त्यावर काल सायंकाळच्या सुमारास खासगी बस चालली होती. मात्र पुढे जात असताना या बसचा अचानक ब्रेक फेल झाला. त्यामुळे या बसने समोर असणाऱ्या वाहनांना जोरात धडक दिली. त्यामुळे ही वाहने एकमेकांना अचानकपणे जोरात धडकली. आणि एकमेकांवर जोरात आदळली. या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला अन्य चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic congestion0 झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाहतूक सुरळीत केली. वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Share This News

Related Post

“ना गंदगी करेंगे, ना करने देंगे” ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बोपोडीत स्वच्छता मोहीम

Posted by - September 20, 2022 0
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपा मार्फत आज विविध सामाजिक उपक्रमातून साजरा केला जात आहे. मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आज…
Dhule News

Dhule News : धक्कादायक ! आजोबांच्या डोळ्यांदेखत बिबट्याचा नातवावर भीषण हल्ला

Posted by - October 25, 2023 0
धुळे : दोन दिवसांपूर्वी धुळे तालुक्यातील (Dhule News) नंदाळे बुद्रुक वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एका लहान मुलीला आपला जीव गमवावा लागला होता.…
Prataprao Bhosale

Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

Posted by - May 19, 2024 0
भुईंज : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले (Prataprao Bhosale) यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज येथील निवासस्थानी आज पहाटे निधन…
heavy Rain

Loksabha : नेत्यांच्या प्रचार सभांवर अवकाळी पावसाचं संकट; ‘या’ नेत्यांच्या सभा झाल्या रद्द

Posted by - May 10, 2024 0
पुणे : गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने आज बऱ्याच ठिकाणी हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा फटका नेत्यांच्या प्रचार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *