दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी, पाच वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड

120 0

रांची- राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा आणि 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आज रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.

139 कोटी रुपयांच्या दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी 15 फेब्रुवारी रोजी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशि यांनी 41 जणांना दोषी ठरवून 21 फेब्रुवारी रोजी शिक्षेवरील सुनावणी निश्चित केली होती. लालू प्रसाद यादव यांच्यासह 38 दोषींच्या शिक्षेवर आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षा सुनावण्यात आली. आज यापैकी 38 जणांना शिक्षा सुनावण्यात आली अन्य तीन दोषी 15 फेब्रुवारीला न्यायालयात हजर झाले नाहीत. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण ?

1990 ते 1995 साली दोरंडा कोषागारातून बेकायदेशीरपणे 139.35 कोटी रुपये काढण्यात आले होते. हे चारा घोटाळ्यातील सर्वात मोठं प्रकरण आहे. याप्रकरणी 1996 साली 170 आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यामधील 55 आरोपींचा मृत्यू झाला असून 7 आरोपी हे साक्षीदार बनले आहेत. तसेच दोन आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. तर 6 आरोपी फरार आहेत. दोरंडा ट्रेझरीमधून 139 कोटी रुपये अवैध पद्धतीनं काढल्याप्रकरणात लालू प्रसाद यादव यांना कोर्टानं दोषी ठरवलं आहे. तर या प्रकरणात इतर 24 जणांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे.

Share This News

Related Post

#CRIME : शेळ्या चरायला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; कुटुंबीयांना कळले तेव्हा होती सात महिन्यांची गर्भवती; औरंगाबाद येथील धक्कादायक घटना

Posted by - January 23, 2023 0
औरंगाबाद हर्सूल : शेळ्या चरायला नेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला कोणालाही सांगितले तर जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस वीस…

“हे गणराया राज्यकर्त्यांना सुबुद्धी दे…!”- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे श्रीमंत दगडूशेठ गणपतीला साकडे VIDEO

Posted by - September 1, 2022 0
पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दगडूशेठ गणपतीच दर्शन घेतलं यावेळी त्यांच्याबरोबर माजी मंत्री विश्वजित कदम, माजी गृहराज्यमंत्री…
Chandrayaan-3

Chandrayaan 3: भारतीयांसाठी ऐतिहासिक दिवस! कशी आहे आजची चांद्रयान-3 ची मोहीम?

Posted by - July 14, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील…

BIG NEWS : मविआ नेत्यांची सुरक्षा घटवली; मिलिंद नार्वेकरांची मात्र वाढवली, वाचा सविस्तर

Posted by - October 28, 2022 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारला पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार…

क्रिकेटर ऋषभ पंतच्या कुटुंबीय आणि डॉक्टरांशी बोलणं झालंय; करत जय शाह म्हणाले…..

Posted by - December 30, 2022 0
  भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाला. दिल्लीहून घरी जात असताना रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *