akola

Akola Violence: वादग्रस्त पोस्टवरून अकोल्यात दोन गटात तुफान राडा; कलम 144 लागू (Video)

357 0

अकोला : अकोला शहरातील जूने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रात्री दोन गटांमध्ये तुफान राडा होऊन दगडफेक करण्यात आली आहे. दोन गटात झालेल्या या तुफान दगडफेक आणि दंगलीमध्ये एकाचा मृत्यू तर चार ते पाच जण यामध्ये गंभीर जखमी झाले. या दोन्ही गटांकडून अनेक वाहनांची तोडफोड तसेच जाळपोळ करण्यात आली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दंगलीतील अनेक लोकांना अटक करण्यात आली असून आता परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलं आहे. तसेच कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं अकोला पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले.

काय आहे नेमके प्रकरण?
अकोल्यात एका सोशल मीडिया ग्रुपवर एक पोस्ट (Controversial Post) आली. त्यामुळे वाद झाला आणि शेकडो लोक रस्त्यावर उतरले या लोकांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. काही तरुणांनी बाईक, गाड्या आणि दिसेल त्या ठिकाणी आगी लावत प्रचंड जाळपोळ केली. त्यामुळे अकोल्यात अधिकच तणाव पेटला. रात्री उशिरा हा प्रकार घडल्याने सामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट निर्माण झाली होती.

144 कलम लागू
अकोल्यात झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात कलम 144 (Section 144) लागू करण्यात आलं आहे. लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. घोळक्यांनी उभे राहण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी आणखी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Share This News

Related Post

आनंदाची बातमी ! केरळमध्ये मान्सूनचे आगमन, हवामान विभागाची माहिती

Posted by - May 29, 2022 0
मुंबई – मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या नागरिकांना आनंदाची बातमी म्हणजे, केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. यावर्षी वेळेआधीचं मान्सून दाखल झाला…

बंडातात्या कराडकर यांची माफी, म्हणाले, ‘अनावधानाने बोललो !’

Posted by - February 4, 2022 0
सातारा- भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाची ह. भ.…
Chhatrapati Sambhaji Nagar Accident

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : दोन ट्रकमध्ये ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेमुळे 3 भावंडांना गमवावा लागला जीव

Posted by - February 8, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar Accident) एक भीषण अपघाताची घटना समोर…
Shina Bora Murder Case

Shina Bora Murder Case : शीना बोरा हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; मृतदेहाचा सांगाडाच झाला गायब

Posted by - June 14, 2024 0
मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. यामध्ये शीना बोराच्या मृतदेहाचा (Shina Bora Murder Case)…
Tuljapur Mandir

Sambhaji Raje Chhatrapati : छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी देवीला दिलेले दागिने गहाळ; संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून चौकशीची मागणी

Posted by - July 25, 2023 0
कोल्हापूर : तुळजाभवानी मातेचे मौल्यवान अलंकार तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी देवीला दिलेले आणि भाविकांनी वाहिलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंची मोजणी पूर्ण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *