माणिकचंद ऑक्सिरीच बनावट लेबल लावणार्‍या ‘ऑक्सिटॉप’ कंपनीच्या मालकावर गुन्हा

536 0

 

पुणे: नामांकित मिनरल वॉटर ’ माणिकचंद ऑक्सिरिच’ या कंपनीच्या पाण्याच्या बाटलीवरील लेबल सारखे बनावट लेबल तयार करून पाण्याच्या बाटल्यांची विक्री ’ऑक्सिटॉप’ कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार मे 2023 मध्ये वाकी खुर्द, चाकण येथे उघडकीस आला.

याप्रकरणी माणिकचंद ऑक्सिरिच मिनरल वॉटर तयार करणार्‍या आरएमडी फुड्स अँड बेव्हरेजस या कंपनीच्या संचालिका शोभा रसिकलाल धारीवाल (68, रा. कोरेगाव पार्क, पुणे) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ऑक्सिटॉप कंपनीचा मालक महेंद्र गोरे (रा. वाकीखुर्द, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शोभा धारिवाल यांना मे 2023 मध्ये आपल्या कंपनीच्या लेबल सारखे हुबेहूब लेबल असलेल्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री विविध ठिकाणी होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी माहिती घेतली असता या बनावट पाण्याची बाटली महिंद्रा ऑक्सिटॉप कंपनीची असुन ही कंपनी आरोपी महेंद्र गोरे याची असल्याचे समजले.

त्यावर त्यांनी अधिक माहीती घेण्यासाठी व्यापार विभागाशी संपर्क साधला असता आरोपीने कोणतीही ट्रेड मार्क मान्यता घेतली नसल्याचे समोर आले. आरोपी गोरे याची महिद्रा एन्टरप्रायजेस ही कंपनी उत्पादित करीत असलेल्या बाटलीवर जाणीवपूर्वक माणिकचंद ऑक्सिरिच कंपनी सारखे लेबल (अक्षरांची साईज, फॉन्ड व अक्षरांची ठेवण कलर) चिटकवून ग्राहकांची फसवणुक करीत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चाकण पोलिस तपास करीत आहेत.

Share This News

Related Post

महत्त्वाची सूचना : मुळशी धरणाच्या सांडव्यावरून ११४०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु

Posted by - August 12, 2022 0
महत्त्वाची सूचना : मुळशी धरण पाणलोट क्षेत्रात पर्ज्यन्याचा कल वाढलेला आहे. दू. ५ः०० वा धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग ९१७६ क्युसेकवरून…

मोठी बातमी! पुण्यातील रुपी बँकेचा परवाना रद्द

Posted by - August 10, 2022 0
पुणे: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राज्यातील अजून एका सहकारी बँकेवर मोठी कारवाई केलीय. आरबीआयने रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवानाच रद्द करण्याचा…

नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच – सभागृह नेते गणेश बिडकर

Posted by - February 17, 2022 0
शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांच्या सुधारणाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. यामध्ये ‘नदीचे केवळ सुशोभिकरण नव्हे तर नदीची सुधारणाच’ केली जाणार…

विद्यार्थ्यांनी निवडलेल्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे : उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - September 24, 2022 0
पुणे : देशाने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. देशाच्या प्रगतीसाठी युवकांचे योगदान महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी शिक्षणानंतर निवडलेल्या क्षेत्रात समर्पित…

मोठी बातमी! बहुचर्चित लवासा प्रकरणी पवार कुटुंबियांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

Posted by - August 8, 2022 0
पुणे: पुण्यातील बहुचर्चित लवासा प्रकरणासंदर्भात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली होती. या निर्णयाविरोधात याचिका करते नानासाहेब…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *