Jalna Muncipality

Jalna Municipality : जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महापालिका; राज्य सरकारची घोषणा

548 0

जालना : जालना नगरपालिकेचे (Jalna Municipality) रुपांतर आता महापालिकेत होणार आहे. त्यामुळे जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महापालिका असणार आहे. राज्य सरकारकडून हे जाहीर करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी अधिसूचना जारी केली आहे. मागच्या काही दिवसांपासून जालना नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत करण्यासंदर्भात राजकीय हालचाली सुरू होत्या. यानंतर आता राज्य सरकारने जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत करण्याचे आदेश दिले आहेत.

जालना शहराची ओळख
जालन्याची स्टील इंडस्ट्रीज म्हणून ओळख आहे. तर मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून जालन्याची मोठी ओळख आहे. दिल्लीपर्यंत जालना जिल्ह्याची मोसंबी विक्रीसाठी जाते. तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जिल्हा म्हणून जालना ओळखला जातो.

Nitesh Rane : …उद्धव ठाकरेंचे कपडे फाडणार; नितेश राणेंची राऊतांना धमकी

राज्यातील एकूण महानगरपालिका पुढीलप्रमाणे
बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका (PMC), नागपूर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, कल्याण- डोंबिवली महानगरपालिका, वसई-विरार शहर महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर, महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, सोलापूर महानगरपालिका, मीरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी- निजामपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, नांदेड-वाघाळा महानगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका, अकोला महानगरपालिका ,उल्हासनगर महानगरपालिका, सांगली, मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका, जळगाव महानगरपालिका, लातूर महानगरपालिका, धुळे महानगरपालिका, अहमदनगर महानगरपालिका, चंद्रपूर महानगरपालिका, परभणी महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका.

Share This News

Related Post

Jalgaon News

Jalgaon News : जळगावमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Posted by - June 30, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Jalgaon News)रावेर तालुक्यातील वडगाव येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणीने…

Stock Market : भारतीय शेअर बाजारासाठी आज काळा दिवस; गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका

Posted by - December 23, 2022 0
Stock Market : या आठवड्यातील व्यवहाराचा शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला. आज सकाळपासून सुरू झालेली घसरण कायम…

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

Posted by - June 9, 2022 0
राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण होती. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करून माहिती…

‘पुष्पा’ सिनेमाची प्रेरणा घेऊन अडीच कोटींचे रक्तचंदन स्मगल करणारा गजाआड (व्हिडिओ)

Posted by - February 4, 2022 0
मिरज- दक्षिणेतील पुष्‍पा चित्रपटामुळे सध्या देशभर रक्तचंदनाच्या तस्करीचा विषय चर्चेत आहे. या सिनेमाची प्रेरणा घेऊन एका चोरट्याने तब्बल अडीच कोटींच्या…

यंदा पावसाचे आगमन दहा दिवस आधीच, कधी येणार मान्सून ? जाणून घ्या

Posted by - May 6, 2022 0
नवी दिल्ली- समस्त देशवासियांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. यंदा देशात 10 दिवस आधीच मान्सून दाखल होणार आहे. मान्सून 20 किंवा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *