DRDO

Pradeep Kurulkar : प्रदीप कुरुलकरसह अन्य एक अधिकारी पाकिस्तानच्या संपर्कात? ATS च्या तपासात समोर

413 0

पुणे : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (ATS) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांना अटक केली आहे. या प्रकरणी त्यांची अधिक चौकशी केली असता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रदीप कुरुलकरसह अन्य एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा एटीएसला संशय आहे.

डीआरडीएचे संचालक प्रदीप कुरुलकर ज्या महिलेच्या संपर्कात होते त्याच महिलेच्या संपर्कात हा एक अधिकारी असल्याचे समोर आले आहे. या अधिकाऱ्याला एटीएसने ताब्यात घेतले आहे. डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्या कॉल आणि डेटा तपशीलांची छानणी करत होते तेव्हा त्यांना या गुप्तचर विभागात काम करणाऱ्या अन्य अधिकाऱ्याचा नंबर सापडला.

Breaking : डीआरडीओ चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना 15 मे पर्यंत ATS कोठडी

या दुसऱ्या अधिकाऱ्याने महिलेसोबत कोणतीही गोपनीय माहिती शेअर केली आहे की नाही याचा तपास सध्या एटीएस अधिकारी करत आहेत. या अधिकाऱ्याचा या हनीट्रॅपमध्ये काही संबंध असल्याचा अजून कोणताच पुरावा पोलिसांना सापडला नाही आहे. मात्र, कुरुळकर यांना हनी ट्रॅप (Honey Trap) करण्यासाठी वापरण्यात आलेला क्रमांक गुप्तचर विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या बाबतीतही वापरण्यात आला असल्याचे तपासात समोर आले आहे.

Share This News

Related Post

Fire

पुण्यातील कल्याणीनगरमधील आयटी पार्कमध्ये भीषण आग

Posted by - May 29, 2023 0
पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये आयटी पार्कमध्ये भीषण आग लागली आहे. या आयटी पार्कमध्ये 300 कर्मचारी अडकले आहेत. या कर्मचाऱ्यांना बाहेर…

Pune News : 40 फुट खोल पाण्याच्या टाकीत पडलेल्या 16 वर्षाच्या मुलीला अग्निशमन दलाच्या जवानांकडून जीवदान

Posted by - December 5, 2023 0
पुणे : दिनांक 04•12•2023 रोजी राञी 09.25 वाजता एक मुलगी एनआयबीएम रस्ता, दोराबजी मॉलसमोर पाण्याच्या टाकीत पडल्याची वर्दी अग्निशमन दल…

मला पक्षादेश पाळायचाय; आजारी असतानाही लक्ष्मण जगताप मुंबईत जाऊन करणार राज्यसभेसाठी मतदान

Posted by - June 9, 2022 0
राज्यसभा निवडणुकीसाठी  मतदान आता काही तासांवर येऊन ठेपले आहे. एका एका आमदाराचे मतदान प्रत्येक पक्षाला अत्यंत गरजेचं झालं आहे. त्यासाठी…
Crime

वडगाव मावळ कोर्टातील सरकारी वकिलांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

Posted by - April 4, 2022 0
आज वडगाव मावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांच्या विरुद्ध एका नवोदित वकिलांना जातीवाचक शिवीगाळ केल्या…

हिम्मत असेल तर रिसॉर्ट पाडून दाखवा, अनिल परब यांचे किरीट सोमय्यांना आव्हान

Posted by - March 26, 2022 0
मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपुर्वी ‘चला अनिल परब यांचे रिसोर्ट तोडुया’ असे ट्विट केले होते. आता दापोलीतील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *