kl-rahul-injury

केएल राहुलच्या जागी ‘या’ खेळाडूची वर्णी; कसोटीमध्ये झळकावळे आहे त्रिशतक

467 0

मुंबई : क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याला मांडीला झालेल्या दुखापतीमुळे आयपीएल 16 व्या सिजनमधून माघार घ्यावी लागली आहे. हि दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला कव्हर होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे तो जून महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधूनदेखील बाहेर पडला आहे.त्यामुळे आयपीएलमध्ये लखनऊ आणि टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे केएल राहुलच्या जागी संघात कोणाला संधी द्यायची हा प्रश्न लखनऊच्या टीमसमोर होता. आता लखनऊच्या टीमने केएल राहुलची रिप्लेसमेंट जाहीर करत भारताच्या एका धडाकेबाज खेळाडूला संघात स्थान दिले आहे. हा खेळाडू दुसरा- तिसरा कोणी नसून करुण नायर आहे. या फलंदाजाने टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक ठोकले होते.

करुण नायर हा आयपीएल 2023 पार पडलेल्या लिलावात अनसोल्ड राहिला. मात्र आता केएल याच्या दुखापतीनंतर लखनऊ सुपर जायंट्स टीम मॅनेजमेंटने करुण नायर याच्यावर विश्वास दाखवत त्याला आपल्या टीममध्ये दाखल करून घेतले आहे. करुण हा आयपीएल 15 व्या सिजनमध्ये राजस्थान रॉयल्स टीमचा भाग होता. राजस्थानच्या टीमने करुणला 1 कोटी 40 लाख रुपये मोजून आपल्या गोटात घेतलं होतं. मात्र त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याला रिलीज करण्यात आले होते.

https://www.instagram.com/p/Cr3p7XFBvfj/?utm_source=ig_embed&ig_rid=fd6d3d2b-2216-4cd7-96e4-e7264659e03e

करुण नायर याची आयपीएल कारकीर्द
करुण नायर याने आतापर्यंत एकूण 76 आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 127.75 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार 496 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 अर्धशतकांचा समावेश आहे. करुणने या खेळीत 161 चौकार आणि 39 सिक्स ठोकले आहेत. 83 ही करुणची आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या आहे.

लखनऊ सुपर जायंट्स संघ
कृणाल पंड्या, (कर्णधार), मनन वोहरा, क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, दीपक हुड्डा, कृष्णप्पा गौतम, करण शर्मा,कायले मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान, रवी बिश्नोई, जयदेव उनाडकट,यश ठाकूर, रोमॅरियो शेफर्ड, निकोलस पूरन, अमित मिश्रा, डॅनियल सॅम्स, प्रेरक मंकड, स्वप्नील सिंग, नवीन उल हक, युधवीर सिंग आणि करुण नायर.

Share This News

Related Post

Team

IND vs AUS Final: इतिहासाची होणार पुनरावृत्ती ! ज्या ज्या वेळी भारताने फायनलला टॉस हरला, त्यावेळी भारताने वर्ल्डकप जिंकला

Posted by - November 19, 2023 0
विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्याला (IND vs AUS Final) काही वेळात सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना…
Ajinkya Rahane

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे बनला मुंबईचा कर्णधार! ‘या’ खेळाडूला संघातून वगळले

Posted by - January 2, 2024 0
मुंबई : भारताचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मागच्या बऱ्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये…
Rohit Sharma

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला ‘हा’ मोठा विक्रम ! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

Posted by - January 12, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि अफगाणिस्तानमधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील (Rohit Sharma) पहिला सामना काल पार पडला. या…
T- 20 World Cup

T20 World Cup : T20 World Cupसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ खेळाडूंचे झाले कमबॅक

Posted by - April 30, 2024 0
अहमदाबाद : टी२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या १५ सदस्यांची टीम जाहीर करण्यात…
Chess World Cup 2023

Chess World Cup 2023 : मॅग्नस कार्लसन पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन ! अंतिम सामन्यात प्रज्ञाननंदचा पराभव

Posted by - August 24, 2023 0
भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद इतिहास रचता रचता राहिला आहे. विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील (Chess World Cup 2023)अंतिम सामन्यात अव्वल मानांकित मॅग्नस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *