Heavy Rain

राज्यातील ‘या’ 7 जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पाऊसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

342 0

पुणे : राज्यात मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे प्रचंड उकाडा तर दुसरीकडे मुसळधार पाऊस अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. त्यातच आता पश्चिम बंगालच्या उपसागरात येत्या दोन दिवसात मोचा चक्रीवादळ धडकणार आहे. यामुळे पुढचे काही दिवस हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Weather Department) वर्तवण्यात आली आहे.

‘या’ 7 जिल्ह्यांना गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, नाशिक, मराठवाड्यामध्ये परभणी लातूर आणि हिंगोली या भागांमध्ये गारपीट (hailstorm) आणि मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे हवामान खात्याने या ठिकाणी ऑरेंट अलर्ट (Orient Alert) जारी केला आहे. तसेच या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांचं संरक्षण करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पूर्णपणे भुईसपाट झाले आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी उन्हाळयात पावसाळ्यासारखी परिस्तिथी निर्माण झाली आहे.

Share This News

Related Post

झुंड चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ जाधवने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Posted by - March 6, 2022 0
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नुकताचं प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन…

शरद पवारांवरील केतकी चितळेची पोस्ट वादाच्या भोवऱ्यात ; केतकीच्या विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल

Posted by - May 14, 2022 0
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणे अभिनेत्री केतकी चितळेला महागात पडलं आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी…
Parbhani News

Parbhani News : महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ! शॉक लागून 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - February 21, 2024 0
परभणी : परभणीतील (Parbhani News) जिंतुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरणच्या सावळ्या गोंधळामुळं चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे.…

आजचे मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय; पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजांमध्ये 8 दिवसांची वाढ

Posted by - September 21, 2022 0
मुंबई : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार. पु.ल. देशपांडे अकादमी मध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाच्या…

महत्वाची बातमी ! शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी अखेर केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात

Posted by - May 14, 2022 0
ठाणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *