गर्जा महाराष्ट्र माझा! 1 मे रोजीच का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन ?

1558 0

आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. विशेष म्हणजे आज गुजरात दिवसही आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्याच्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते. त्यावेळी या मुंबई प्रांतात मराठी आणि गुजराती भाषकांची संख्या अधिक होती. दोन्ही भाषिकांकडून स्वतंत्र राज्याची मागणी केली जात होती. त्यामुळे भाषावार प्रांतरचनेमुळे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन वेगळ्या राज्याची घोषणा करण्यात आली. 1 मे 960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्यामुळे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.

महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली? 

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्ये मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली. त्या वेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. त्याच वेळी भाषावार प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली. गुजराती भाषिकांना स्वत:चे वेगळे राज्य हवे होते. त्याच वेळी मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते. या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली. या आंदोलनांचा परिणाम म्हणून १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये २५ एप्रिल १९६० रोजी संसदेतर्फे लागू करण्यात आलेल्या बॉम्बे पुनर्गठन अधिनियम १९६० नुसार अस्तित्वात आली. हा कायदा १ मे १९६० रोजी अमलात आला. बॉम्बे पुनर्गठन अधिनियमांतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात विभागले गेले आणि दोन्ही स्वतंत्र राज्ये झाली.

Share This News

Related Post

रिकाम्या पोटी डाळिंब खाणे फायदेशीर ! जाणून घ्या कारणे

Posted by - April 1, 2023 0
आरोग्याच्या बाबतीत आता प्रत्येकजण खूप काळजी घेताना दिसतो. आरोग्यासाठी फळे खाणे चांगले असते. असे डॉक्टर सांगतात. म्हणून बरेच लोक फळे…

मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह 800 जणांना नोटीस

Posted by - May 3, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद मधील सभेत मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक घेतली असून मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी सरकारला दिलेला…

काय आहे केंद्राची अग्निपथ योजना ? या योजनेला होणारा विरोध योग्य आहे का ?

Posted by - June 16, 2022 0
नवी दिल्ली- केंद्र सरकारने भारतीय सैन्यदलासाठी अग्निपथ योजना अमलात आणण्याचे ठरवले आहे. मात्र त्यापूर्वीच या योजनेला तीव्र विरोध होताना दिसून…

विनयभंग म्हणजे काय ? गुन्हा सिध्द झाल्यास आरोपीला काय शिक्षा होते ?

Posted by - November 14, 2022 0
राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आव्हाड यांनीच ट्विट करून ही माहिती दिली.”पोलिसांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *