शिंदे गटाची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव; ‘या’ मागणीने ठाकरे गटाला धक्का

999 0

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच आता पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेत मोठी मागणी केली आहे.

शिवसेना भवन, शाखा, निधी आम्हाला द्यावा अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली असून 24 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्याची मागणी शिंदेंच्या शिवसेनेनं केली आहे असल्याची माहिती ॲड. आशिष गिरी यांनी दिली आहे.

ठाकरे गटाच्या याचिकेवर येत्या 24 एप्रिलला सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गटाने याचिका सादर केली होती. या याचिकेसोबत आता पुन्हा नवी याचिका कोर्टात दाखल झाली आहे. त्यामुळे कोर्ट येत्या 24 तारखेला गिरी यांचीही याचिका सुनावणीसाठी घेणार की या याचिकेवर इतर दिवशी सुनावणी ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

माझी याचिका ही शिंदे गटाची याचिका नाही. त्यांच्याशी काहीच संबंध नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. मी एक वकील आहे. तसाच मी मतदार आहे. महाराष्ट्रातील मतदार आहे. त्यामुळे मी याचिका दाखल केली आहे. मी शिंदेंची बाजू घेत नाही. मी कायद्याची बाजू घेत आहे. उद्या उद्धव ठाकरेच अध्यक्ष राहिले तर शिवसेना भवन, शाखा आणि निधी त्यांच्याकडे जाईल. जर शिंदे अध्यक्ष झाले तर सर्व गोष्टी शिंदेंकडे जातील. पण तोपर्यंत या गोष्टींवर स्टे आणण्यात यावा, अशी माझी मागणी आहे, असंही गिरी यांनी स्पष्ट केलं.

 

Share This News

Related Post

राज ठाकरे यांच्या भाषणाचा आढावा घेणार, आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत गृहमंत्र्यांची बैठक

Posted by - May 2, 2022 0
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर गृह खात्याने राज ठाकरे यांच्या भाषणाचा परामर्श घेण्यास सुरुवात केली आहे.…
sharad pawar and ajit pawar

Ajit Pawar : शरद पवार अजित पवारांची पुण्यात गुप्त बैठक पार पडली; भेटीत नेमकं काय घडलं?

Posted by - August 12, 2023 0
पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा आणि साखर उद्योगाच्या दृष्टीनं महत्त्वाची संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राज्यातील…

राष्ट्रवादीचे राज्यपालांना काळे झेंडे दाखवत आंदोलन; राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे- पाटील आक्रमक

Posted by - December 2, 2022 0
पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्त्याबाबत वाद क्षमतांना दिसत नाहीये. सातत्याने राज्यपाल कोश्यारी यांना…

धक्कादायक : प्रेमात झाले किरकोळ वाद; प्रेयसीवर केला थेट धारदार शस्त्राने वार, पुण्यात थरार

Posted by - November 9, 2022 0
पुणे : पुणे पुन्हा एकदा एका भयंकर हत्याकांडानं हादरल आहे. पुण्यातील औंध परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचा तिच्या प्रियकरानं धारदार शस्त्राने…
Zika Virus

Zika Virus : पुणेकरांनो सावधान ! शहरात आढळला झिकाचा पहिला रुग्ण

Posted by - November 16, 2023 0
पुणे : पुण्यात महाराष्ट्रातील सातव्या झिका (Zika Virus) प्रकरणाची पुष्टी झाली आहे. यानंतर आरोग्य विभागाने जिल्ह्यांना परिस्थितीवर पाळत ठेवण्यास सांगितलं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *