चलो अयोध्या ! मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याचे नियोजन त्याच पदाधिकाऱ्यांकडे ज्यांनी…….

696 0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या रविवारी अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. या कार्यक्रमाचा एक टिझर देखील सोशल मीडियावर झळकला आहे. एकूणच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या कार्यकर्त्यांसाठी रेल्वेची एक स्वतंत्र बोगी आरक्षित करण्यात आली आहे. तसेच या अयोध्या दौऱ्याची धुरा नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवरच सोपविण्यात आली आहे.

नाशिकहून शिवसैनिक विशेष रेल्वेने दुपारी चारनंतर अयोध्येला रवाना होणार आहेत. 18 बोगीतून 1200 शिवसैनिक आयोध्येत दाखल होणार आहेत. याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून खास टीशर्ट आणि रेल्वे बोगीवर लावण्यासाठी स्टिकर्स तयार करण्यात आले असून त्याचे वाटप सुरू झाले आहे. तालुका आणि विधानसभा मतदारसंघ निहाय कार्यकर्त्यांसाठी बोगी आरक्षित करण्यात आली आहे. अयोध्येत मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ’ या बॅनरखाली अयोध्या दौऱ्याचा प्रचार सुरू केला आहे.

या अयोध्या दौऱ्याची धुरा नाशिकच्या त्याच पदाधिकाऱ्यांवरच सोपविण्यात आली आहे. ज्यांनी यापूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे यशस्वी नियोजन केले असे संपर्कनेते भाऊसाहेब चौधरी, सचिव नरेश म्हस्के यांच्यासह जिल्हाप्रमुख अजय बोरस्तेंचे पथक अयोध्येत दाखल झाले आहेत. हा दौरा यशस्वी करण्याची धुरा त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी नाशिकमधून तीन हजार कार्यकर्तेही रेल्वेने रवाना होणार आहेत. तसेच महाआरतीमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Share This News

Related Post

शैक्षणिक : सर्व विद्यापीठांचे एकत्रित वेळापत्रक जाहीर करणार – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - December 31, 2022 0
नागपूर : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षांचे, निकाल लागण्याचे एकत्रित वेळापत्रक तयार करुन जाहीर करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री…

कसबा विधानसभा पोटनिवडणूक 2023 : संभाजी ब्रिगेडच्या वतीने उमेदवार जाहीर; कोणाला मिळाली उमेदवारी ? वाचा हि बातमी

Posted by - February 6, 2023 0
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूक 2023 संभाजी ब्रिगेडच्या वतीने अधिकृत उमेदवार शिवश्री अविनाश मोहिते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.…
Sharad Pawar

Sharad Pawar : ‘2004 ला भाजपसोबत जायचं होतं?’ शरद पवारांचा मोठा खुलासा

Posted by - December 2, 2023 0
पुणे : शुक्रवारी कर्जमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचं शिबीर पार पडलं. या शिबीरात बोलताना अजित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केले.…
Dhananjay Munde And Sharad Pawar

Dhananjay Munde : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना परळीत मोठा धक्का ! मुंडेंचे ‘हे’ खंदे समर्थक जाणार शरद पवार गटात

Posted by - August 17, 2023 0
बीड : कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना परळीत मोठा धक्का बसला असून मुंडे (Dhananjay Munde) यांचे खंदे समर्थक बबन…

#Travel Diary : या उन्हाळ्यात हिल स्टेशनला भेट द्यायचा विचार करताय ? देवभूमी उत्तराखंडमधील ‘ही’ ठिकाणे परफेक्ट

Posted by - February 28, 2023 0
देवांची भूमी असलेले उत्तराखंड हे भाविक आणि पर्यटक दोघांच्याही आकर्षणाचे केंद्र आहे. या पवित्र भूमीवर अनेक प्रमुख देवस्थळे आहेत. जिथे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *