पुणे लोहमार्ग पोलिसांनी निवडला दुसरा ‘मार्ग’ आणि झाली निलंबनाची कारवाई

379 0

प्रवाशांना धमकावून लुबाडणारी टोळी तुम्ही ऐकली असेल. पण खाकी गणवेशात साहित्य तपासणीच्या नावाखाली प्रवाशांची लुबाडणूक करणाऱ्या सहा पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पुणे लोहमार्ग पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

सहायक पोलिस उपनिरीक्षक बाळू पाटोळे (एलसीबी, पुणे लोहमार्ग), पोलिस हवालदार सुनील व्हटकर (एलसीबी, पुणे लोहमार्ग), पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यातील प्रशांत बजरंग डोईफोडे, जयंत गणपत रणदिवे, अमोल युवराज सोनवणे आणि विशाल दत्तात्रेय गोसावी अशी निलंबित केलेल्या सहा पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

पुणे रेल्वे स्थानकावर घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांकडे प्रवाशांचे साहित्य तपासण्याचे काम होते. त्यांनी तीन एप्रिल रोजी दुपारी एका तरुणासह त्याच्या मैत्रिणीला अडवून बॅगेत गांजा असल्याच्या संशयावरून त्यांची चौकशी केली. या दोघांना लोहमार्ग पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांसमोर हजर केले. त्याची नोंद स्टेशन डायरीत करून त्यांना सायंकाळी सोडून दिले.

दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी या दोघांकडून पाच लाख रुपये घेतल्याची माहिती मुंबईच्या लोहमार्ग पोलिस महासंचालक कार्यालयातून पुणे लोहमार्गचे प्रभारी पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांना देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश राजेश बनसोडे यांनी पोलिस निरीक्षक इरफान शेख यांना दिले.

त्यानुसार रेल्वे फलाटावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता हे सहा कर्मचारी दोषी आढळले. बनसोडे यांनी या सहा कर्मचाऱ्यांवर बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्याचे आदेश दिले. या निलंबित कर्मचाऱ्यांकडे अनेक महिन्यांपासून प्रवाशांचे साहित्य तपासणीचे काम होते. त्यांना कोणाच्या सांगण्यावरून हे काम दिले गेले, हे मात्र अजून समजले नाही.

या सहाजणांपैकी एकावर प्रवाशांचे साहित्य तपासणीत गैरप्रकार केल्यामुळे जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. तरीही त्याची रेल्वे स्थानकात नियुक्ती केल्याचे समोर आले आहे.

Share This News

Related Post

Mumbai Satra Court

बेस्ट बेकरी प्रकरणी दोन आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता

Posted by - June 13, 2023 0
मुंबई : गुजरातमधील (Gujrat) बेस्ट बेकरी प्रकरणात (The Best Bakery Case) मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या निर्णयात…
Satara Crime News

Satara Crime News : आयुष्याला वैतागून केला आयुष्याचा शेवट; 2 दिवसांनी मृतदेह मिळताच घरच्यांनी फोडला हंबरडा

Posted by - August 12, 2023 0
सातारा : सातारा (Satara Crime News) आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील नीरा नदीच्या सारोळा येथील पुलावरून उडी टाकून कराड (Satara Crime…

#PUNE : टिळक कुटुंबाला भाजपने डावलल्याने शैलेश टिळक यांनी व्यक्त केली नाराजी म्हणाले, “बाकी कोणी उमेदवारी मागायला नको होती…!”

Posted by - February 4, 2023 0
पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदार संघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. ही पोटनिवडणूक…
Latur Accident

Latur Accident : लातूरमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Posted by - April 10, 2024 0
लातूर : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये (Latur Accident) ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *