एप्रिल महिन्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट या जिल्ह्यात पडणार पाऊस

366 0

मार्च महिन्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु असतानाच आता पुन्हा अवकाळी पावसाचे ढग दाटून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भातील ट्विट ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी केले आहे.

मेच्या अखेरीस अवकाळी पाऊस पडतो. पण यंदा मार्चमध्येच पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर पुन्हा एप्रिल महिन्यात काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

४ ते ७ एप्रिल दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये ६ आणि ७ एप्रिल रोजी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानंतर मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्येही ६ आणि ७ एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूरमध्ये ४ आणि ५ एप्रिल रोजी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पडतोय अवकाळी पाऊस

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मार्च महिन्यात पाऊस झाला होता असे हवामान विभागाचे मत आहे. मार्च महिन्यात आतापर्यंत चार वेस्टर्न डिस्टर्बन्सने उत्तर पश्चिम भारतातील मैदानी परिसरांना प्रभावित केलं आहे. एप्रिल महिन्यात हिच परिस्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

Share This News

Related Post

Sunil Tatkare

NCP President: सुनील तटकरे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी आपल्याबरोबर असल्याचा दावा केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (NCP President) म्हणून त्यांनी सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे…

महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाचा ३० वा वर्धापन दिन : महिला आयोग-फेसबुक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ

Posted by - January 24, 2023 0
     मा.मुख्यमंत्री व महिला बालविकास मंत्री यांच्या हस्ते महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा गौरव मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा…

11 डिसेंबर रोजी पुण्यात पादचारी दिनानिमित्त उद्या लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक बंद

Posted by - December 10, 2022 0
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावरील उंबर्‍या गणपती चौक ते गरूड गणपती चौकदरम्यान वॉकिंग प्लाझाचं आयोजन करण्यात…

HEALTH : टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन तासभर बसता का ? जरा ही बातमी वाचाच, होऊ शकतात हे गंभीर परिणाम

Posted by - February 14, 2023 0
HEALTH : आज-काल मोबाईलचा वेड इतकं लागला आहे की अनेक जणांना टॉयलेटमध्ये जाताना मोबाईल घेऊन जाण्याची सवय असते. तुम्ही देखील…

सणासुदीच्या दिवसात एसटी कर्मचाऱ्यांवर येणार आर्थिक संकट ? राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे एसटी महामंडळासमोर मोठे आव्हान

Posted by - September 19, 2022 0
महाराष्ट्र : पुढच्या महिन्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कसा करायचा हा पेचाचा प्रश्न एसटी महामंडळासमोर उभा ठाकला आहे. सरकारकडून एसटी महामंडळास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *