ठोस पुराव्याच्या अभावी कुख्यात गुंड गजा मारणेला जामीन

1014 0

व्यावसायिकाकडे वीस कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठोस पुराव्याच्या अभावी त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी मारणेला जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात मारणे याच्या विरोधात ठोस पुरावा मिळाला नाही’ असा उल्लेख आदेशात केला आहे.

खंडणीप्रकरणी मारणे याच्यासह त्याच्या १८ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मारणेला अटक केली होती. ‘मारणे याच्या विरोधात ठोस पुरावे नाहीत. त्याचा खंडणीप्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध नाही. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा,’ अशी विनंती मारणेचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तीवादात केली. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी मारणे याची २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश दिले.

Share This News

Related Post

#crime : 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार ! दोघांच्याही कुटुंबीयांची चौकशी, मुलांचं बालपण हरवतंय ? याला जबाबदार नक्की कोण ?

Posted by - February 17, 2023 0
उरण : एक विचित्र घटना उरण मधून समोर येते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर 14 वर्षाच्या अल्पवयीन…

पुण्यातील प्राध्यापिका झाल्या जेएनयुच्या पहिल्या महिला कुलगुरू

Posted by - February 7, 2022 0
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापिका शांतिश्री धुलिपूडी पंडित यांची दिल्लीतील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयु) कुलगुरू म्हणून निवड करण्यात…

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात ; चार जणांचा जागीच मृत्यू

Posted by - April 9, 2022 0
  पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज दुपारी झालेल्या कारचा भीषण अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कारनं उभ्या ट्रकला…

पुन्हा बंधनं नको असतील तर; कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं ‘हे’ आवाहन

Posted by - April 27, 2022 0
राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठ्यावरच रोखायचे असेल…

ग्रामीण भागात हेलिपॅड ठीकंय, पण…; मुख्यमंत्र्यांच्याच गावाजवळ शिक्षणाच्या प्रश्नाची कोर्टाने घेतली दखल

Posted by - July 14, 2022 0
मुंबई : खिरखंड या गावाजवळच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव आहे आणि त्या गावात चांगले रस्ते, रुग्णालय, शाळा नाही. पण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *