मुंबईत सकाळपासूनच ईडीची धडक कारवाई, या छापासत्राबाबत काय म्हणाले संजय राऊत ?

447 0

मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीसंदर्भात काही नेत्यांनी केलेल्या कराराची माहिती घेण्यासाठी मुंबईत सकाळपासूनच ईडीची धडक कारवाई सुरु आहे. हे छापे मुंबईच्या सी-वॉर्डमध्ये टाकण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाने एनआयए आणि ईडीने छापे टाकले असल्याचे म्हटले जात आहे. ईडीकडून दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आणि बहीण हसिना पारकर यांच्या घरीही छापे टाकण्यात आले असल्याची माहिती आहे. काही राजकीय नेत्यांनी दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्ता खरेदी केली. त्या व्यवहारावरून हे छापासत्र सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे छापे मुंबईच्या सी-वॉर्डमध्ये टाकण्यात आले आहेत. दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकरचा ताबा घेऊन ईडी आणखी चौकशी करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, ईडीच्या छाप्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्राच्या सुरक्षेचा मुद्दा असल्यास सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र
या प्रकरणात नेत्यांची नावे येतील की घुसवली जातील हे मात्र सांगता येणार नसल्याचे राऊत म्हणाले.

Share This News

Related Post

विरोधी पक्षनेते अजित पवार आज माध्यमांसमोर येणार; ‘त्या’ विधानावरून काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

Posted by - January 4, 2023 0
मुंबई: छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित…

मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या जागेबाबत लवकरच निर्णय घेणार – एकनाथ शिंदे

Posted by - September 11, 2022 0
मुंबई: महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल. त्यांचा…

आजची सर्वात मोठी बातमी : बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा; प्रदेश काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर

Posted by - February 7, 2023 0
नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून कडू राजकारणाला झालेली सुरुवात मोठ्या विघ्नाकडे वाटचाल करते आहे. काँग्रेसमधील दोन बड्या नेत्यांमधील…
Nagpur News

Nagpur News : मित्राला वाचवायला गेला अन् स्वत:चाच जीव गमावून बसला

Posted by - January 27, 2024 0
नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आपल्या अल्पवयीन बहिणीने घरातून पळ काढल्याने डिप्रेशनमध्ये गेलेल्या…
Ashish Deshmukh

Top News Special Political journey of Ashish Deshmukh : देवेंद्र फडणवीसांशी वाद ते पुन्हा भाजपावापसी; कसा आहे आशिष देशमुखांचा राजकीय प्रवास?

Posted by - June 18, 2023 0
पुणे : आशिष देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणातलं सातत्यानं चर्चेत असलेले नाव. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) आज पुन्हा एकदा भाजपावासी झाले असून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *