ब्रेकिंग … पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, 4 ठार, 5 जखमी

568 0

लोणावळा- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर आज, मंगळवारी सकाळी चार वाहने एकामेकाना धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागले तर पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी बोरघाटात घडला.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर दोन मार्गिकेमधून दोन कंटेनर जात होते. त्यावेळी मागील छोट्या वाहनांना पुढे जाण्यासाठी जागाच राहिली नव्हती. या दोन कंटेनरमधून वेन्यू कारने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन कंटेनरमध्ये ही कार चेपली गेली . त्यात कारचा चक्काचूर झाला. पुण्यातील या गाडीमधील चौघांचा जागीच मृत्यु झाला. तर तिच्या मागोमाग येणारी आणखी एक कार त्यांना धडकली. एक ट्रक, एक आयशर टेम्पो आणि स्विफ्ट व वेन्यू कार अशी चार वाहने या अपघातात सापडली आहेत.

त्यात 5 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महाराष्ट्र सुरक्षा दल, देवदूत रेस्क्यु टीम आणि खोपोली, खंडाळा महामार्ग पोलीस दाखल झाले.  या अपघाताने मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ही वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु केले.

Share This News

Related Post

17 तासांच्या अज्ञातवासानंतर अजितदादा प्रकटले ! सर्वांचा एकच प्रश्न….एवढे तास कुठे होते ?

Posted by - April 8, 2023 0
राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे काल दुपारी अचानक गायब झाले. सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार नॉट…

अतिवृष्टीतील मदत कार्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतर्क,यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश

Posted by - July 5, 2022 0
मुंबई: राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष…

पुणे महापालिकेकडून आगामी गणेशोत्सवात 150 फिरत्या विसर्जन हौदांची सुविधा

Posted by - August 16, 2022 0
पुणे : आगामी गणेशोत्सवासाठीचं नियोजन पुणे महापालिकेकडून सुरू झालं आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत १५० फिरते हौद उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन…

हवा गुणवत्ता सुधारणेच्या पुण्याच्या प्रयत्नांचा जागतिक पातळीवर गौरव; जगातील शंभर अग्रेसर शहरांच्या समुहाकडून पुरस्कार जाहीर

Posted by - October 21, 2022 0
पुणे : वायू प्रदुषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अधिकाधिक ई-बसेसचा समावेश करत पुणे शहराने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी यशस्वी…

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराभव

Posted by - March 10, 2022 0
नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज होत असून पंजाबमधून धक्कादायक निकाल समोर आला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *