Breaking News रामनवमीच्या उत्सवादरम्यान मंदिरात आलेले 25 भाविक कोसळले विहिरीत

444 0

आज रामनवमीचा सण सर्वत्र उत्साहात सुरु आहे.अशातच मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीवरील छत तुटल्यामुळे मंदिरात श्रीरामाच्या दर्शनासाठी आलेले २५ भाविक विहिरीत कोसळले. इंदूरच्या श्री बेलेश्वर महादेव झूलेलाल मंदिरात ही घटना घडली. बचावकार्य सुरु असून या भाविकांना बाहेर काढण्याचे कार्य सुरु आहे.

रामनवमीमुळे मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आले होते. मंदिरात रामनवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रम सुरु असताना मंदिराच्या आवारात असलेल्या विहिरीवरील छत तुटले. आणि त्यावर उभे असलेले भाविक विहिरीत कोसळले. या घटनेमुळे सर्वत्र हलकल्लोळ माजला. या घटनेत सुमारे २५ भाविक जखमी झाल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. तत्पूर्वी विहिरीत पडलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. सहा भाविकांना विहिरीबाहेर काढण्यात यश आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

ऐकावे ते नवलचं ! काजूकतली फुकट दिली नाही म्हणून दुकानदारावर रोखली बंदूक, गोळी थेट…

Posted by - December 21, 2022 0
पुणे : पुण्यातील सिंहगड रोडवर एक अजब घटना घडली आहे. खरंतर या प्रकरणातील अवघ्या 23 वर्षीय आरोपीकडे गावठी कट्टा असणे…

यशवंत जाधवांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर आयकर विभागाची टाच; 41 मालमत्ता जप्त

Posted by - April 8, 2022 0
मुंबई- शिवसेना नेते यशवंत जाधव सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. त्यामुळे जाधव यांच्याभोवती कारवाईचा फास आणखी आवळताना दिसत आहे. यशवंत…
Satara News

Satara News : संतापजनक ! मायलेकीला कपडे फाटेपर्यंत मारहाण; साताऱ्यामधील घटना

Posted by - July 24, 2023 0
सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये साताऱ्यात (Satara News) फलटणमधील कुरवली खुर्द या…
Imran Khan

इम्रान खान यांचे सरकार जाणार की टिकणार ? आज रात्री अविश्वास ठराव मांडला जाणार

Posted by - March 28, 2022 0
कराची- पाकिस्तानसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पाकिस्तानमध्ये सत्तेवरून राजकीय गोंधळ सुरू आहे. इम्रान खान आपली खुर्ची वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न…

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना 2023 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

Posted by - March 23, 2023 0
पुणे : पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे गेली ३३  वर्षे सातत्याने दिला जाणारा आणि देशासह परदेशातही प्रतिष्ठेचा समजला जाणारा २०२३ या वर्षाचा पुण्यभूषण पुरस्कार मराठी-हिंदी नाट्य-चित्रपट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *