#PUNE : नदीपात्रातील झाडे वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते चढले झाडावर ; राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार आंदोलन

384 0

पुणे : नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली पुणे महापालिकेने नदीपात्रातील हजारो झाडे तोडण्याची तयारी चालविली आहे. पुण्याच्या पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने याला विरोध दर्शविला असून आज वृक्षतोडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

आंदोलनाची भूमिका समजावून सांगताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी महापालिकेवर कठोर टिका केली. ते म्हणाले की, “नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली पुणे महापालिका प्रशासन सहा हजार झाडांची कत्तल करणार असेल तर हे निश्चितच पुणेकरांच्या दृष्टीने चांगलं चिन्हं नाही.जी झाडं तोडण्याचा प्रस्ताव आहे ती देशी झाडं असून अनेक पक्षांचा नैसर्गिक अधिवास आहे , राष्ट्रवादी काँग्रेसचा या झाडांच्या कत्तलीला तीव्र विरोध आहे.

ते पुढे म्हणाले की, पुणे शहराचा विकास ही व्हायला हवा व पर्यावरणाचे रक्षण ही व्हावे. यांचा सुवर्णमध्य राखण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. यासाठी त्यांनी काम केले पाहिजे. कोणताही शास्त्रशुद्ध अभ्यास न करता ही झाडे तोडली जात आहेत. एकूण सहा हजारांहून अधिक झाडे तोडली जाणार असतानाही केवळ काही झाडे महापालिका पुनर्ररोपन करणार आहे. पण त्यांचे योग्य संगोपन न झाल्यास त्याचा काहीही उपयोग होणार नाही. महापालिका या सर्व झाडाच्या संगोपनाच्या यशस्वितेची खात्री देणार का ? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

प्रवक्ते प्रदिप देशमुख म्हणाले की, केवळ आपल्या बॉसेसना खुश करण्यासाठी हा खटाटोप करण्यात येत आहे.या सर्व झाडांचे पुनर्रोपण करता येणे अशक्य आहे. आम्ही देखील विकासाचे समर्थक आहोत पण पर्यावरणाचा बळी देऊन होणारा विकास आम्हाला अमान्य आहे.
यावेळी पक्षाचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांनी झाडावर चढून आपला निषेध नोंदविला आहे.

यावेळी शहाराघ्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख , दिपाली धुमाळ ,किशोर कांबळे , नितीन कदम , अजिंक्य पालकर , मनोज पाचपुते , कैलास मकवान , विक्रम जाधव , हरीश लडकत , फईम शेख, शिल्पा भोसले इ प्रमुख उपस्थित होते.

Share This News

Related Post

मोठी बातमी : विरोधी पक्षातील महिला आमदार आणि खासदार राज्यपालांच्या भेटीला; त्यानंतर तातडीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनावर दाखल वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - November 14, 2022 0
मुंबई : नुकतीच महिलांच्या बाबत आक्षेपार्ह विधाने झाल्याने महिला नेत्यांमध्ये सध्या धुसफुस सुरू आहे. राजकारणामध्ये राजकीय कामकाज सोडून महिलांवर अवमानकारक…

CM EKNATH SHINDE : दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाच्यावतीनं मुंबई महापालिकेकडं अर्ज

Posted by - September 2, 2022 0
मुंबई : मागच्या अनेक दिवसांपासून शिवाजी पार्कवरती होणाऱ्या दसरा मेळाव्याची चर्चा होती. दसऱ्याच्या दिवशी नक्की शिवसेनेचा मेळावा होणार की एकनाथ…

खळबळजनक : पुणे शहरात विक्षिप्त अघोरी कृत्य; मूलबाळ व्हावे म्हणून डोक्यावर बंदूक ठेवून खायला लावले घुबडाचे पाय आणि स्मशानभूमीतून आणलेल्या मृतांची राख

Posted by - January 19, 2023 0
पुणे : पुण्यातून अत्यंत खळबळ जनक प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी या स्वतः बी इ कॉम्प्युटर झालेले आहेत. 2019 मध्ये…

#PUNE : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद हजारो तरुणांचा सहभाग, ठिकठिकाणी जंगी स्वागत

Posted by - February 22, 2023 0
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्राचारार्थ आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत रोड शो…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *