#कौतुकास्पद : आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बनवली दिव्यांग बांधवांसाठी खास ब्लाइंड स्टिक, कसा होणार फायदा पहा

1217 0

नाशिक : इगतपुरी शहरातील महात्मा गांधी हायस्कूल येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ विद्यार्थ्यांनी दिव्यांग बांधवांना उपयुक्त ठरेल अशी ब्लाइंड स्टिक बनवली आहे. या काठीमुळे दिव्यांग बांधवांना दिड फुटांवर काही अडथळा आल्यास त्याची पूर्वसूचना मिळणार आहे.

आय. ओ. टी.(Internet of things ) कोर्स करत असताना शिक्षिका अनिषा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्याना प्रश्न विचारला की. तुम्ही विशेष असे काय करू शकतात त्यानंतर विद्यार्थ्याना कल्पना सुचली की, आपण दिव्यांग बांधवांसाठी अशी काठी बनवूया जेणे करून ते चालत असताना समोर काही अडथळा आला तर त्यांना लगेच कळेल व ते आपला मार्ग सुरक्षितपणे बदलतील.

ह्या भावनेने हे विद्यार्थी लगेच काठी बनविण्यासाठी कामाला लागले व अवघ्या एक दिवसात त्यांनी या काठीची निर्मिती केली आहे. ही काठी बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पाईप, अल्ट्रा सोनिक सेन्सर, बझर, मायक्रो कंट्रोलर, आर डी नो उनो बोर्ड, 9 वॉल्ट ची बॅटरी इत्यादी साहित्याचा वापर केला आहे. ही काठी बनविण्यासाठी त्यांना शाळेचे मुख्याध्यापक अनिल पवार, उप मुख्याध्यापक उमाकांत वाकलकर, पर्यवेक्षक लक्ष्मीकांत ठाकरे, शिक्षिका अनिशा कुलकर्णी, शिक्षक अविनाश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले, मुलांनी बनविलेल्या या काठीमुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नवीन शैक्षणिक धोरणानुार ६ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना इंटरनेट ऑफ थिंग्स हा कोर्स शिकवला जात आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याची संधी मिळत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असून विदयार्थी स्मार्ट डस्टबिन, स्मार्ट कार, स्मार्ट संगणक लवकरच बनवणार आहेत त्या दृष्टीने त्यांची कार्यशाळा सुरू आहे.

या विद्यार्थ्यांनी बनवली स्टिक

(1)हृदय बागल (2) प्रितेश भागडे (3) निखिल चव्हाण (4)जगदीश राक्षे (5)अनिल चौधरी (6) सुनील चौधरी (7) हर्षद भागडे (8) रोहित गांगुर्डे (9) जय शिंदे (10) अंकुश मोरे (11) सार्थक मुळीक (12) जयेश भागडे (13) वैभव पाटील

Share This News

Related Post

लडाख येथील अपघातात साताऱ्याच्या फलटण येथील जवान वैभव भोईटे यांना वीरमरण

Posted by - August 20, 2023 0
देशसेवा बजावत असताना लडाख येथे जवानांच्या गाडीचा अपघातात 9 जवानांना वीरमरण आले.. त्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील राजाळे गावचे सुपूत्र…
Shashikant ahankari

Dr. Shashikant Ahankari : हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचं निधन

Posted by - August 8, 2023 0
पुणे : उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूरचे प्रसिद्ध समाजसेवक, हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी (Dr. Shashikant Ahankari) यांचे…
LPG Gas

गॅस सिलिंडरच्या दरात बदल! ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त झाला सिलेंडर

Posted by - June 1, 2023 0
मुंबई : सगळीकडे महागाई (Inflation) वाढल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे बजेट (Budget) ढासळत आहे. त्यातच आता सर्वसामान्य लोकांना थोडासा दिलासा मिळणारी बातमी…

‘समोर या ! बसून मार्ग काढू’, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदे गटाला आवाहन

Posted by - June 28, 2022 0
मुंबई- कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा,…

होळी 2023 : होळीची सुरुवात कशी झाली ? रंगपंचमीच्या दिवशी नक्की रंग का खेळला जातो ? पौराणिक कथा

Posted by - March 4, 2023 0
होळी 2023 : हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्ष पौर्णिमेच्या तिथीला होलिका दहन केले जाते आणि प्रतिपदा तिथीला रंगतदार पणे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *