वैयक्तिक शेततळ्यासाठी राज्यात 4 हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू

189 0

पुणे : राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीसाठी ६ हजार ४१२ शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली आहे. त्यापैकी तांत्रिक कारणामुळे नाकारण्यात आलेले आणि शेतकऱ्यांनीच रद्द केलेले अर्ज वगळता ४ हजार १३७ शेतकऱ्यांच्या अर्जावरील कार्यवाही सुरू आहे अशी माहिती कृषि विभागाने दिली आहे.

राज्याच्या विविध भागातील पावसाचे असमान वितरण आणि पावसातील अनिश्चित येणारे खंड यामुळे सिंचनाअभावी पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते. त्यामुळे पावसाळ्याच्या काळातील पावसाचे पाणी साठवणूक करुन उन्हाळा तसेच इतर टंचाईच्या कालावधीत पिकांसाठी संरक्षित सिंचनाची सोय करण्याच्या दृष्टीने शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे ठरते.

योजनेत जून २०२२ मध्ये शेततळ्याचा समावेश

पर्जन्याधारीत शेतीसाठी पाणलोटावर आधारीत जलसंधारणाच्या उपाययोजनांद्वारे पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी यापूर्वी शासनाने शेततळे योजना अनुदानावर राबविलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. त्यामुळे शासनाने २९ जून २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करून या योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश केला. या योजनेमध्ये शेततळ्याच्या आकार आणि प्रकारानुसार १४ हजार ४३३ ते ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते.

या योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला असून राज्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने ‘महाडीबीटी’ पोर्टलवर नोंदणी केली होती. त्यापैकी ६ हजार ४१२ शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने (लॉटरी) निवड झाली. तथापि पोर्टलवर कागदपत्रे अपलोड न केल्यामुळे रद्द झालेले अर्ज तसेच स्वत:हून व्यक्तिगत कारणास्तव आपले अर्ज रद्द केलेले शेतकरी वगळता ४ हजार १३७ अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. यापैकी २ हजार ६२१ शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केले असून इतर अर्जदारांकडून ही कार्यवाही सुरू आहे.

शेतकऱ्यांनी अपलोड केलेल्या कागदपत्रांची कृषि सहाय्यक आणि त्यानंतर तालुका कृषि अधिकारी यांच्याकडून पडताळणी करण्यात येते. आतापर्यंत १ हजार ६८७ अर्जांची तालुका कृषि अधिकाऱ्यांकडून पडताळणी व पूर्वसंमती देण्यात आली असून उर्वरित अर्जांची छाननी सुरू आहे, अशी माहिती कृषि संचालक (मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन) रवींद्र भोसले यांनी दिली आहे.

Share This News

Related Post

#PUNE : कर्तव्यावर असताना पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - February 4, 2023 0
पुणे : सेनापती बापट चौक जंक्शन येथे कर्तव्य बजावत असताना पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन…

मदर्स डे निमित्त मुलाची आईला अनोखी भेट, आई आणि मुलाने जोडीने केले विमान उड्डाण, पाहा व्हिडिओ

Posted by - May 11, 2022 0
आई आणि मुलाचे नाते याबद्दल कितीही वर्णन केले तरी ते अपुरेच ठरते. आईसाठी आपला मुलगा आणि मुलासाठी आपली आई जिवाच्या…

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 2 डिसेंबरपर्यंत ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा

Posted by - December 1, 2022 0
पुणे : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची…
Pune Murder

भर दिवसा तरुणाची गोळ्या झाडून हत्या! पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरलं

Posted by - May 22, 2023 0
पिंपरी-चिंचवड : पुण्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. काही दिवसांपूर्वी तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या परिसरात जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे…

Special Report : वादाच्या भोवऱ्यात सापडणारी नृत्यांगना गौतमी पाटीलची कहाणी ! कसा आहे तिचा आतापर्यंतचा प्रवास

Posted by - January 11, 2023 0
अनेक लावणी कलाकार तिच्यावर नाराज आहेत. लावणीच्या परंपरेला गालबोट लावण्याचा आरोपही तिच्यावर केला जातो. अशी कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडणारी ती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *