#CREDIT CARD : क्रेडिट कार्डवर चारचाकी खरेदी करताय ? थांबा ही माहिती वाचा

642 0

अर्थकारण : क्रेडिट कार्डमुळे खिशात पैसा बाळगण्याची गरज राहिलेली नाही. काहींची मर्यांदा लाखांच्या घरात असल्याने बरीच मंडळी क्रडिट कार्डवरून व्यवहार करण्यास प्राधान्य देतात. महिनाभराची मुदत असल्याने क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासही अवधी मिळतो. क्रेडिट कार्डवर शुल्क आकारले जात नसल्याने नागरिकांना त्यावरून व्यवहार सोयीचे वाटते.

तसेच रिवॉर्ड पॉइंटस, कॅशबॅक ऑफरही लागू असल्याने वस्तू खरेदी करताना अधिक फायदा पदरात पडतो. आता तर मोटारही क्रेडिट कार्डवर घेण्याचा काही जण विचार करतात. कार कर्ज घेण्यासाठी बँकेत चकरा माराव्या लागतात आणि अपेक्षित कर्ज मिळेलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे क्रेडिट कार्डच्या आधारावरच मोटार खरेदीचा विचार करतात. मात्र मोटार खरेदीसाठी कर्ज हाच चांगला उपाय मानला जातो. जर क्रेडिट स्कोर खराब आहे म्हणून तुम्ही जर क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर त्याऐवजी स्कोर चांगला कसा करता येईल, यादृष्टीने प्रयत्न करावा. मोटार खरेदीसाठी कर्ज हाच एक सर्वोत्तम मार्ग सांगितला जातो आणि सर्वसाधारणपणे खरेदीदार याच मार्गाचा अवलंब करताना दिसून येतात. केवळ पाच टक्के नागरिक प्लॅस्टिक मनीचा वापर करतात. म्हणूनच कार्डवर मोटार खरेदीने होणारा फायदे आणि नुकसान सांगता येतील.

शून्य व्याजदर : अनेक क्रेडिट कार्ड कंपन्या कार्ड वापरावर आकर्षक योजना, ऑफर्स पॉइंटसची सवलत देतात. शून्य व्याजदराची योजना लागू असेल तर त्या कालावधीत कोणताही अतिरिक्त पैसा न मोजता कार खरेदी करू शकतो. व्याजाचा एकही रुपये त्यामुळे द्यावा लागत नाही. परंतु अशावेळी काही छुपे कर आकारले आहेत का, याची चौकशी किंवा छाननी करावी. कारण जर छुपे कर लागू असतील तर क्रेडिट कार्डचा वापर केल्यानंतर जबर व्याज वसुल केले जाते. त्यामुळे क्रेडिट कार्डचा अर्ज भरताना आणि त्यावर मोटार खरेदी करताना सर्व अटी आणि नियम तपासून घेणे गरजेचे आहे. के्रडिट कार्डची मर्यादा लक्षात घेऊन वापरावे.

कॅशबॅक: क्रेडिट कार्डवर मिळणारी कॅशबॅक ऑफर आता सामान्य बाब झाली आहे. याशिवाय सणासुदीच्या काळात अनेक बँका, वित्तिय संस्था या ग्राहकांना खूश करण्यासाठी अधिकाधिक कॅशबॅकची ऑफर बहाल करतात. मोटारसाठी जर ऑफरच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर केला तर आपल्या पदरात कॅशबॅकची रक्कम पडते. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गृहपयोगी वस्तूंवर पाच ते दहा टक्के कॅशबॅक मिळते. मोटारसारख्या मोठ्या वस्तूंवर कॅशबॅकची किती रक्कम मिळू शकते, याची चौकशी करावी.

अन्य ऑफर्स : क्रेडिट कार्ड कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी अनेक ऑफर्स बहाल करत असतात. सणासुदीच्या काळात, नववर्षाचे स्वागत, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, गणपती उत्सव यानिमित्ताने क्रेडिट कार्डवर रिवार्ड पॉइंटसची योजना देते. या काळात खरेदी केलेल्या वस्तूंवर पॉइंटस आपल्या खात्यात जमा होतात. कालांतराने वर्षभरापासाठी हे पॉइंटस बाळगू शकतात आणि ती रिडीम केल्यास पैशाच्या रुपाने किंवा वस्तूंच्या रुपाने गिफ्ट ग्राहकांना देण्यात येते. जर मोटार खरेदी केली तर यात सर्वाधिक रिवॉर्डस पॉइंटस मिळू शकतात. अशा मोठ्या खरेदीवर कितीपर्यंत पॉइंटस मिळू शकतात, याची खातरजमा करून घ्यावी.

मर्यादित पर्याय: मोटार विक्री करणारे सर्वच डिलर क्रेडिट कार्डचा वापर करतात असे नाही. मोटारचे संपूर्ण पेमेंट क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करण्यास डिलर राजी होईलच याची खात्री देता येत नाही. काही डाऊन पेमेंट करून उर्वरित रक्कम के्रडिट कार्डमधून स्वीकारली जाते. त्यामुळे अशावेळी कारवर कर्ज देणार्‍या अनेक वित्तिय संस्थांचे प्रतिनिधी मदतीसाठी उपलब्ध असतात. आजकाल मोटारीवरील व्याजदरात घट झाल्यामुळेे बहुतांशी खरेदीदार कर्जाच्या पर्यायाचा विचार करतात.

क्रेडिट कार्डवरील खरेदीवर मर्यादा असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी या कार्डाचा वापर करावाच असे नाही. आपत्कालिन काळात क्रेडिट कार्डची गरज पडते. अशा वेळी मोटार खरेदीवर त्याची मर्यादा संपवणे चुकीचे ठरू शकते.

क्रेडिट कार्डची मर्यादा: प्रत्येक कार्डची खर्चाची मर्यादा वेगवेगळी असते. एखाद्या मोटारीचे बेसिक मॉडेल खरेदी करायचे म्हटले तरी किमान किंमत 3 ते चार लाख रुपये असते. आपल्या क्रेडिट कार्डची मर्यादा दोन लाख रुपये असेल तर कार खरेदीवर मर्यादा असतात. अशा वेळी दोन तीन क्रेडिट कार्डचा वापर करून मोटार खरेदीची प्रक्रिया पूर्ण होते. परंतु अधिक क्रेडिट कार्ड वापरल्यामुळे क्रेडिट स्कोअर खराब होण्याचा धोका अधिक असतो. तसेच रिपेमेंट करताना देखील बरीच तारांबळ होते. अशावेळी निम्मी कॅश आणि उर्वरित रक्कम क्रेडिट कार्डने जमा केल्यास काहीअंशी फायदा ठरू शकतो.

यात सर्वात चांगला उपाय म्हणजे कर्जावर गाडी खरेदी करणे. यात विमा संरक्षण मिळते. कार्ड खरेदीवर गाडीला कंपनीकडून विमा संरक्षण मिळेलच याची हमी देता येत नाही.

खराब आर्थिक पत: क्रेडिट कार्डचा अधिक वापर हा आपल्या सिबील स्कोरवर परिणाम करणारा ठरतो. एखादेवेळी क्रेडिट कार्डचे बिल भरताना खात्यात पुरेशी शिल्लक नसेल तर त्याचा थेट परिणाम आर्थिक दंडावर होतो.

क्रेडिट कार्डवर अनाश्यक खरेदी टाळून बिल भरण्याचा ताण हलका करावा. दरवर्षी क्रेडिट कार्डवरील खर्चाची मर्यादा वाढणे अपेक्षित असते. परंतु आपण बिल भरताना अनेकदा हाराकिरी केलेली असल्यास भविष्यात कर्ज मंजूर होताना, या गोष्टीचा विचार केला जातो.

Share This News

Related Post

Aadhar Update

फ्रीमध्ये ऑनलाइन आधार अपडेटसाठी आज शेवटची संधी! उद्यापासून मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Posted by - June 14, 2023 0
नवी दिल्ली : मोफत आधार कार्ड अपडेट करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर तुम्ही आज आधार कार्ड अपडेट केले…

कर्नाटक मुख्यमंत्र्यांची पुन्हा आडमुठी भूमिका; महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील गावांसाठी दिलेला निधी कर्नाटक सरकार रोखणार? काय म्हणाले बोम्मई, वाचा

Posted by - March 16, 2023 0
कर्नाटक : राज्य अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील एकूण 865 गावांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून 54 कोटी…

MP Girish Bapat : पुणे रेल्वे स्थानकाला पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी रेल्वे स्टेशनचा टर्मिनल म्हणून विकास करा

Posted by - September 21, 2022 0
पुणे : पुणे रेल्वे स्थानकाला पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी रेल्वे स्टेशनचा टर्मिनल म्हणून विकास करावा अशा सूचना खासदार बापट यांनी…
Weather Update

Weather Update : राज्यात पुन्हा कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

Posted by - April 24, 2024 0
मुंबई : हवामान विभागाने (Weather Update) आज महाराष्ट्रात सर्वदूर विजांच्या कडडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. धुळे, नाशिक पालघर वगळता राज्यात…

पुष्कर सिंह धामी यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Posted by - March 23, 2022 0
उत्तराखंड- उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजप) विजय मिळवून देणारे पुष्कर सिंह धामी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *