crime

#NASHIK : घरच्या लग्नाला आले नाहीत म्हणून पत्नी आणि मुलांनी वडिलांनाच संपवले; घटना ऐकून पोलीसही चक्रावले

608 0

नाशिक : नाशिकच्या चांदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरच्या लग्नाला आले नाहीत म्हणून पत्नी आणि दोन मुलांनी स्वतःच्या वडिलांनाच मारहाण करून संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नाशिकच्या चांदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुंदलगाव आहे. मनमाड आणि मालेगाव या दोन शहरांच्या मध्ये हे कुंदलगाव असून या गावात राहणाऱ्या पूनमचंद शिवाजी पवार यांची पत्नी आणि दोन मुलांनी निर्दयीपणे हत्या केली आहे. पूनमचंद पवार यांच्या पुतणीचा लग्न सोहळा होता. या लग्न सोहळ्यामध्ये पुनमचंद यांची पत्नी सुनीता आणि दोन मुलं भूषण आणि कृष्णा हे उपस्थित होते. पण लग्नामध्ये स्वतः पुनमचंद हे उपस्थित नसल्यामुळे त्यांना सातत्याने, ‘ते का आले नाहीत ?’ अशी विचारणा घरातून होत होती.

दरम्यान पूनमचंद जेव्हा घरी आले तेव्हा त्यांची पत्नी आणि मुलांनी त्यांना जबर मारहाण केली. या मारहाणी मध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी पुनमचंद यांच्या भावाला ही माहिती दिली. पुनमचंद यांचे भाऊ घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या भावाला डॉक्टरकडे घेऊन जाऊ असे सांगितले. परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Share This News

Related Post

Maoists News

Maoists News : माओवाद्यांच्या ‘त्या’ बड्या नेत्याला अटक; महाराष्ट्र कनेक्शन आले समोर

Posted by - September 16, 2023 0
मुंबई : सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये दोन कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या उच्चशिक्षित जहाल माओवादी नेत्याला (Maoists…

पूर्ववैमनस्यातून पुण्यात 21 वर्ष तरूणाची हत्या

Posted by - March 19, 2022 0
पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चोघांनी मिळून 21 वर्षीय तरूणावर कोयत्यानं वार करून खून  केल्याची घटना बिबवेवाडीतील सुपर इंदिरानगरमधील  सुवर्णयुग मित्र…

पुण्यातील शेवटच्या कोरोना रूग्णाला ‘नायडू’ मधून डिस्चार्ज

Posted by - April 6, 2022 0
पुणे – दोन वर्षापूर्वी राज्यात सर्वात प्रथम पुण्यात पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद झाली होती. आता पुण्यातील महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या…
Sharad Mohol

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं? ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

Posted by - January 6, 2024 0
पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol Murder) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली.…

संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी, शिवसेनेकडून अधिकृत घोषणा ! कोण आहेत संजय पवार ?

Posted by - May 24, 2022 0
मुंबई- अखेर राज्यसभेसाठी शिवसेनेकडून सहावा उमेदवार म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *