स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी पुन्हा रखडली ! ‘या’ कारणामुळे रखडल्या आहेत निवडणुका

461 0

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी पुन्हा एकदा रखडली आहे. दरम्यान 14 मार्चला सुनावणी घेऊ असं सरन्यायाधीश यांनी गेल्या सुनावणीमध्ये म्हटलं होतं. मात्र आज याचिकेवर साधी मेन्शनिंग देखील झाली नाही तर सुनावणी देखील होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. सत्ता संघर्षावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होईल. त्यामुळे 15 किंवा 16 मार्चनंतर ही सुनावणी होऊ शकते. दरम्यान आता पावसाळ्याआधी या निवडणुका होण्याची शक्यता मावळली आहे.

या कारणामुळे रखडल्या आहेत निवडणुका

1. कोरोनामुळे निवडणुका लांबल्या होत्या

2. ओबीसी आरक्षणाला ग्रीन सिग्नल मिळाला. त्यानंतर जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांमध्ये आरक्षण मिळावं यासाठी शिंदे सरकार कोर्टात गेले आहे.

3. आता सत्ता बदलामुळे पुन्हा एकदा या निवडणुका रखडल्या आहेत. कारण सत्ता संघर्षावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबतच्या केसेस वर सुनावणी होईल असं सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.

दरम्यान ओबीसी आरक्षण मिळालं त्यानंतर 92 नगरपरिषदांमध्येही आरक्षण मिळावे. यासाठी शिंदे सरकार कोर्टात गेलं महाविकास आघाडीच्या काळात वॉर्डरचना चार ऑगस्ट रोजी एका अध्यादेशाने या सरकारने बदलली, त्यानंतर 22 ऑगस्ट ला सुप्रीम कोर्टाने जैसे थेचे आदेश दिले होते त्यानंतर या प्रकरणावर कोणतेही सुनावणी झालेली नाही.

Share This News

Related Post

प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Posted by - June 2, 2022 0
पिंपरी – प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून आज गुरुवारी (दि. 2) डिस्चार्ज मिळाला आहे. डॉक्‍टरांनी काही…
Maharashtra Rain

पुण्याला पुन्हा अलर्ट ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्यापासून बरसणार मुसळधार पाऊस

Posted by - July 31, 2024 0
पुण्याला पुन्हा अलर्ट ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्यापासून बरसणार मुसळधार पाऊस पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर गेले दोन दिवस पावसाने दांडी…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - July 19, 2023 0
मुंबई : सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून (Maratha Reservation) ओबीसी कोट्यातून 50 टक्क्यांच्या मर्यादेत…

आधी मटण खाल्लं मग…..; माजी मंत्री विजय शिवतारेंचा खासदार सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप

Posted by - March 5, 2023 0
पुणे: राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही आणि कोण कुणावर कुठला आरोप करेल याचा काही अंदाज नाही. आता…
EVM

Solapur Loksabha : खळबळजनक ! मतदाराने पेट्रोल टाकून EVM मशीन जाळली

Posted by - May 7, 2024 0
सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभेसाठी (Solapur Loksabha) आज सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. उन्हाळा असल्यामुळे सकाळी साडेसात वाजल्यापासूनच अनेक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *