“मी शेतकऱ्यांची माफी मागतो, येथे दहा दिवसात या प्रश्नावर तोडगा निघेल…!” कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी शेतकऱ्यांची मागितली माफी

902 0

रासायनिक खते खरेदी करत असताना इ पॉस मशीनमध्ये शेतकऱ्यांना आपली जात लिहावी लागत आहे. जात न लिहिता ते मशीन पुढची कार्यवाही करत नाही हा मुद्दा अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी चांगलाच उचलून धरला. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारला कळविले आहे असे ते म्हटले, तर खुद्द कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे.

यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, खतं खरेदी करत असताना जातीचा उल्लेख करावा लागतोय. त्याबद्दल मी केंद्रीय कृषिमंत्र्यांशी बोललो आहे. त्याबद्दल लवकरच निर्णय होईल. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला नाही तर मला वाईट वाटतं. त्यामुळे मी शेतकऱ्यांची माफी मागतो. येत्या दहा दिवसात या प्रश्नावर तोडगा निघेल असं देखील सूतोवाच त्यांनी केल आहे.

दरम्यान नाफेडची सध्या 40 केंद्र सुरू असून कांद्याला नाफेडच्या दराप्रमाणे भाव मिळत आहे. हे युक्रेन रशियाच्या युद्धामुळे होतंय. महाराष्ट्र सरकार कांद्याला किती अनुदान द्यायचे याबद्दल विचार करत आहे. पण अधिवेशन संपण्याच्या अगोदर या प्रश्नावर तोडगा काढला जाईल. असे देखील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

Share This News

Related Post

जिओ इन्स्टिट्यूट जागतिक नेत्यांची पुढची पिढी तयार करेल : नीता अंबानी

Posted by - July 21, 2022 0
मुंबई : भारतातील उच्च शिक्षणाची नव्याने व्याख्या करण्यासाठी आणि आमचे संस्थापक, माझे सासरे, धीरूभाई अंबानी यांचा वारसा पुढे नेण्यासाठी जिओ…
Santacruz Hotel Fire

Santacruz Hotel Fire : सांताक्रूझमधील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग, 3 जणांचा मृत्यू

Posted by - August 27, 2023 0
मुंबई : मुंबईतील सांताक्रूझ (Santacruz Hotel Fire) येथील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये (Santacruz…

खासदार नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा

Posted by - April 13, 2022 0
अमरावती- खासदार नवनीत रवी राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे वाय प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या निर्णयामुळे खासदार नवनीत रवी…
Nandurbar News

Nandurbar News : नंदुरबारमध्ये जिवाभावाच्या मैत्रिणींचा करुण अंत

Posted by - May 23, 2024 0
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar News) नवापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये तालुक्यातील बोरपाडा धरणात जिवलग मैत्रिणींचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *