उत्साहाच्या भरात काहीजण बरंच काही बोलून जातात ; अजित पवार यांची कुणाला कोपरखळी ?

158 0

पुणे- पुणे महानगरपालिकेचा प्रारूप प्रभाग आराखडा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीचे 122 नगरसेवक निवडून येतील असा दावा केला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी उत्साहाच्या भरात काहीजण बरंच काही बोलून जातात असं उत्तर देत प्रशांत जगताप यांना कोपरखळी मारली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, मी कधी असा दावा केलेला नाही. बारामतीमध्ये उमेदवारीचा अर्ज भरताना निवडून येण्याची अपेक्षा व्यक्त करतो. कारण कुणाला निवडून द्यायचं ते मतदार ठरवत असतो असे अजित पवार म्हणाले.

यावेळी अजित पवार यांनी शिवजयंती सोहळा शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर होणार असून या वेळी प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती दिली.

Share This News

Related Post

उपयोगाची माहिती : सिबिल स्कोअरवर ठेवा लक्ष; क्रेडिट स्कोअर किती असावा ?

Posted by - December 18, 2022 0
अर्थकारण : कोणतेही कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर अर्थात सिबील स्कोअर चांगला असणे गरजेचे आहे. क्रेडिट स्कोअर चांगला राहावा यासाठी त्यावर…

सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयार, सीबीआयकडून वाझेचा अर्ज मंजूर

Posted by - May 26, 2022 0
मुंबई- सीबीआयने माफीचा साक्षीदार होण्यासाठी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी केलेला अर्ज मान्य केला आहे. सचिन वाझेंनी आरोपींविरोधात आपल्याकडे असणारी…

Breaking News ! पुण्यात खराडी परिसरातील महालक्ष्मी लॉन्स समोरील दुकानांना भीषण आग

Posted by - April 20, 2022 0
पुणे- पुण्यात खराडी परिसरातील महालक्ष्मी लॉन्स समोरील दुकानांना भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या…

ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून पडलेल्या विद्यार्थिनीचा अखेर मृत्यू

Posted by - March 30, 2023 0
पुण्यातील ससून रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने वैद्यकीय शिक्षण घेणारी 20 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली होती. ही घटना बुधवारी…
Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांनी व्यक्त केली ‘ती’ भीती; म्हणाले…

Posted by - May 8, 2024 0
अहमदनगर : महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे महाविकास आघाडीची सभा घेण्यात आली. या सभेला शरद पवार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *