बैलगाडा शर्यतीहून परतताना पिकअप गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू , चार जण जखमी

522 0

आंबेगाव- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील बेल्हा जेजुरी महामार्गावर लोणी येथे पिकअप गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

आकाश लोणकर असे मृत तरूणाचे नाव असून तो अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील शिरपूर गावचा रहिवासी आहे तर जखमी तरुण पिंपरखेड चोंभुत शिरपूर परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जण बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मावळ तालुक्यातील नाणोली येथे गेले होते. शर्यतीहून परत येताना प्रवास करत असलेल्या पिकअप गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. यावेळी पिकअप गाडीमधून एकूण 16 ते 17 तरुण प्रवास करत होते. सध्या जखमींवर मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

चंद्रकांत पाटील यांना हवं ते मंत्रीपद मिळाल नसेल म्हणून त्यांची मानसिक स्थिती बिघडलीय – अजित पवार

Posted by - October 8, 2022 0
पिंपरी चिंचवड : एक वेळ आई वडिलांना शिव्या द्या, चालेल, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना…

पुणेकर थंडीने गारठले, राज्यात सर्वात कमी तापमान पुण्याचे, वाचा सविस्तर

Posted by - November 1, 2022 0
पुणे : दिवाळीनंतर पावसानं उसंत घेतली पण पुणेकरांची स्थिती सध्या आगीतून फुफाट्यात झाल्यासारखे आहे पावसानं यावर्षी पुणेकरांना मोठ्या प्रमाणावर जोडपून…
Pune News

Murlidhar Mohol : नवमतदारांनी भारताच्या विकासाचे भागीदार व्हावे : मुरलीधर मोहोळ

Posted by - April 14, 2024 0
पुणे : विश्वगुरू नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता करण्यासाठी नवमतदारांनी महायुती ला मतदान…

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सुपरस्टार विल स्मिथने ख्रिस रॉकच्या कानाखाली लगावली (व्हिडिओ)

Posted by - March 28, 2022 0
लॉस एंजेलिस – सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या यंदाच्या १४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला एका घटनेने गालबोट लागले आहे.…
University of Pune

University of Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Posted by - January 26, 2024 0
पुणे : उच्च शिक्षणापासून कोणताही घटक वंचित राहू नये, तळागळातील प्रत्येक विद्यार्थी हा विद्यापीठाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अविभाज्य भाग आहे, ह्याच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *