#PUNE ACCIDENT : कात्रज बोगद्याजवळ विचित्र अपघात; वाहनांची अक्षरशः उलथापालत !

722 0

पुणे : कात्रज बोगद्याजवळ आज सकाळी विचित्र अपघाताची घटना घडली आहे. दरी पूल पेट्रोल पंपाजवळ मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने टेम्पो ट्रॅव्हलला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये टेम्पो ट्रॅव्हल्ससह दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गावर सकाळच्या सुमारास हि घटना घडली असून दरी पूल पेट्रोल पंपाजवळ मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव ट्रकने टेम्पो ट्रॅव्हलला धडक दिली. या धडकेमध्ये टेम्पो ट्रॅव्हल्ससह दोन कारचे मोठे नुकसान झाले आहे. या वाहनांची अक्षरशः उलथापालथ झाली आहे. या अपघातात एकूण सहा जण जखमी झाले आहेत. सुदैवाने सीट बेल्ट लावला असल्याने प्रवासी वाचले असल्याचे समजते.

दरम्यान अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

ज्येष्ठ लेखक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन, पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयात अखेरचा श्वास

Posted by - November 30, 2022 0
पुणे : सामाजिक भान असलेले लेखक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन झालं आहे. ते ७४ वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर…

#Pune : तरुणाचे व्यायाम करून झाल्यानंतर फोनवर बोलत असताना दुर्दैवी निधन; मृत्यूचे कारणही आहे धक्कादायक ;नक्की जबाबदार कोण ?

Posted by - March 21, 2023 0
पुणे : ओपन जिममध्ये व्यायाम केल्यानंतर फोनवर बोलत असताना तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. अमोल शंकर नाकते (वय २१ वर्ष) या…

Breaking News ! उद्योगपती अविनाश भोसले यांना नजरकैदेत ठेवण्याचा मुंबई सत्र न्यायालयाचा आदेश

Posted by - May 27, 2022 0
मुंबई- पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले यांना काल, गुरुवारी रात्री सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.…

तुकडा तांदूळ निर्यातीवरील बंदी तातडीने मागे घ्या ! किसान सभेची केंद्र सरकारकडे मागणी

Posted by - September 14, 2022 0
केंद्र सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू केली असून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के निर्यातकर लागू करण्याचा निर्णय घेतला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *