#PUNE : कसबा पोटनिवडणुकीची उद्या सकाळी दहा वाजता सुरू होणार मतमोजणी; निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

301 0

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूक ही 26 फेब्रुवारी रोजी पार पडली. या निवडणुकीचा निकाल आता उद्या म्हणजेच दोन मार्चला लागणार आहे. दरम्यान या मतमोजणीला उद्या सकाळी दहा वाजता सुरुवात होणारा असून ही मतमोजणी कोरेगाव पार्कमधील अन्न धान्य गोदामात होणार आहे.

अनेक नाट्यमय घडामोडी झाल्यानंतर आणि या जागेसाठी दोन्हीही प्रमुख पक्षांचे दिग्गज नेते आणि खुद्द मुख्यमंत्री देखील प्रचारासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळेच या निकालाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचा देखील लक्ष लागला आहे. या मतमोजणी दरम्यान केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

त्याचबरोबर सेंट मीरा कॉलेज ते आतुर पार्क सोसायटीकडे जाणाऱ्या वाहनांना मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी गल्ली क्रमांक एक मधून प्रवेश दिला जाणार आहे. परिसरातील नागरिकांनी या वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबत नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर दरोडे पथ मार्गावर वाहने देखील पार्क करता येणार नाहीत.

उद्याच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. निवडणूक प्रचारादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेला लागलेलं गालबोट या निकालाच्या दृष्टीने आता अधिक गंभीरतेने घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच पोलीस प्रशासन देखील सतर्क आहे.

Share This News

Related Post

Pankaja Munde

Pankaja Munde : ‘तोपर्यंत फेटा बांधणार नाही’; जाहीर सभेत पंकजा मुंडेंनी केला निर्धार

Posted by - February 22, 2024 0
बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्या पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथे संत…
Shri Guruji Talim Ganpati

गणपती बाप्पा मोरया ! श्री गुरुजी तालीम गणपती आगमन सोहळा पहा टॉप न्यूज मराठीवर LIVE

Posted by - September 19, 2023 0
पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन…

विधानसभा निवडणुकीत कशी असेल भाजपाची रणनीती?; कोअर कमिटी बैठकीत देण्यात आल्या ‘या’ सूचना

Posted by - July 20, 2024 0
लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सज्ज झाल्याचे पाहायला मिळत असून भाजपाच्या मुंबईतील कार्यालयात दोन दिवसीय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *