कर्णबधिर मुले आणि ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीर संपन्न डॉ. रजनी इंदुलकर यांची प्रमुख उपस्थिती

460 0

पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटर, सिग्निया आणि महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबीर पार पडले. ७५ लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. डॉ. रजनी इंदुलकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले.

पूर्व तपासणी मध्ये आढळून आलेल्या ऐकू न येण्याच्या क्षमतेनुसार लाभार्थ्यांना दिडशे श्रवणयंत्र मोफत बसविण्यात आले. या प्रसंगी डॉ. रजनी इंदुलकर, डॉ. सुनील जगताप, सिवान्टोस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ अविनाश पवार, किशालया चक्रवर्ती, सुमुख कसर्ले, वायडेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मधुसूदन भाडे, चव्हाण सेंटरच्या सीईओ दिप्ती नाखले, विजय कान्हेकर, दत्ता बाळसराफ, दिपिका शेरखाने तसेच कुमार वासनी, विशाल शाह, अमित पाटील हे उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील कर्णबधिर मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी २०१३ पासून सातत्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून तब्बल वीस हजार हून अधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे.

चव्हाण सेंटरच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे या करत असलेल्या या स्तुत्य उपक्रमाची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली असून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये सुद्धा त्याची नोंद झाली आहे. बालेवाडी येथे २०१८ मध्ये झालेल्या शिबिरात एका दिवसात म्हणजे अवघ्या ८ तासात तब्बल ४ हजार ८०० लाभार्थ्यांना श्रवणयंत्र बसविण्यात आले होते.

Share This News

Related Post

“हे गणराया राज्यकर्त्यांना सुबुद्धी दे…!”- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे श्रीमंत दगडूशेठ गणपतीला साकडे VIDEO

Posted by - September 1, 2022 0
पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दगडूशेठ गणपतीच दर्शन घेतलं यावेळी त्यांच्याबरोबर माजी मंत्री विश्वजित कदम, माजी गृहराज्यमंत्री…
Crime

पिंपरीत गावगुंडांचा हैदोस; घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

Posted by - January 15, 2023 0
पिंपरीतील कॅम्प परिसरात गावगुंडांच्या दहशतीचा पुन्हा एक व्हिडिओ समोर आलाय. पिंपरी कॅम्प परिसरातील एका दुकानाची तोडफोड करून गावगुंडांनी दुकानमालक आणि…

आजची सर्वात मोठी बातमी : बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा; प्रदेश काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर

Posted by - February 7, 2023 0
नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून कडू राजकारणाला झालेली सुरुवात मोठ्या विघ्नाकडे वाटचाल करते आहे. काँग्रेसमधील दोन बड्या नेत्यांमधील…

पेट्रोल आणि डिझेलनंतर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ, जाणून घ्या एलपीजी सिलेंडरची किंमत

Posted by - March 22, 2022 0
नवी दिल्ली- रशिया-युक्रेन युद्धाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलनंतर आता एलपीजीच्या दरातही वाढ झाली आहे. 14.2…

सिक्कीममध्ये हिमस्खलन होऊन ६ पर्यटकांचा मृत्यू तर अनेकजण बर्फात गाडले गेल्याची भीती

Posted by - April 4, 2023 0
सिक्कीममध्ये हिमस्खलन होऊन ६ पर्यटकांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एक मुलगा यांचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *