भारतातील पहिला व्हर्च्युअल रियालिटी (VR) चित्रपट : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या वरील चित्रपटाची घोषणा

639 0

पुणे : मुक चित्रपटापासून सुरू झालेला सिनेमाचा प्रवास कृष्णधवल, रंगीत ७० mm असा करत थ्री डी आणि ८ डी पर्यन्त आज पोहोचला आहे. तसेच दूरचित्रवाणीसह संपूर्ण मनोरंजन विश्व सातत्याने  होत असलेल्या संशोधनामुळे बदलत गेले आहे. मोबाइल च्या जमान्यात तर आज  चित्रपट पाहण्यासाठी गेम्स खेळण्यासाठी  तळहाता एवढ्या डिस्प्ले चा आपण वापर करत आहोत. तंत्रज्ञान अतिशय पुढे जात असताना आपण सध्या व्हर्च्युअल रियालिटी ( VR) तंत्रज्ञानापर्यंत पोहोचलो आहोत.

आता याच तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिल्या चित्रपटाची निर्मिती पुणेकर करत असून हा चित्रपट स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा ऐतिहासिक चारित्रपट असणार आहे, अशी माहिती सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संचालक संतोष रासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी प्रसिद्ध अभिनेते आणि या चित्रपटाचे लेखक – दिग्दर्शक योगेश सोमण, तेजोनिधी भंडारे (सीईओ -रिलाइन्स अॅनिमेशन ),अमित नाडकर्णी – (उपाध्यक्ष सृजन विद्याव्रत),बाळू काटे(स्टोरी बोर्डिंग आर्टिस्ट),रवी बारापत्रे(टेक्निकल दिग्दर्शक) आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना संतोष रासकर म्हणाले, मनोरंजनाच्या क्षेत्रात आज आमूलाग्र बदल झाला आहे. सध्याच्या काळात  व्हर्च्युअल रियालिटी आणि मेटावर्स ही शब्द आपण ऐकतो आहोत. वास्तवाचा आभास निर्माण करू शकणाऱ्या व्हर्च्युअल  रियालिटी तंत्रदणायच्या मदतीने जगात काही चित्रपट निर्माण करण्यात आले आहेत. VR तंत्रज्ञानावर आधारित  चित्रपट पाहण्यासाठी साठी विशिष्ट प्रकारच्या हेडसेट बॉक्स ची गरज असते. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जगाला ओळख करून देताना आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत.

सृजन निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन योगेश सोमण करणार आहेत. प्रसिद्ध अॅनिमेटर चंद्रकांत पाटील या चित्रपटाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक असणार आहेत तर  रवी बारापत्रे, बाळू काटे, संतोष जाधव, उमेश कोकाटे आणि अंशूल रासकर या चित्रपटाची तांत्रिक बाजू सांभाळणार आहेत. रिलायन्स अनिमेशन स्टुडिओ चे कलाकार देखील या मध्ये सहकार्य करणार आहेत.

लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण म्हणाले, सावरकर यांच्या जीवनावरील या ४५ मिनिटांच्या व्हर्चुअल रिअल चित्रपटात स्वा. विनायक दामोदर सावरकर यांना दोन जन्मठेपांची शिक्षा झाली होती पैकी १९११ ते १९२१ या काळात सावरकर पोर्ट ब्लेअर वरील सेल्युलर जेल येथे बंदीवासात होते. सेल्युलर जेलमध्ये सावरकर बंधूंनी अनन्वित अत्याचार सहन केले, त्याशिवाय सावरकरांनी राजबद्यांची क्रांतिकारकांची संघटना बांधली, साक्षरतेचा प्रसार केला, हिंदू शुद्धीकरणाची मोहीम राबवली,  इतकंच नाही तर पहिल्या महायुद्धाच्या काळात युरोपातील अभिनव भारत च्या क्रांतिकारकांनी सावरकरांची मुक्तता करण्यासाठी एमडेन नावाची युद्ध नौका धाडली होती त्या सुमारास सावरकरांनी मार्सेलीस सारखा निसटण्याचा प्रयत्न केला असेल का ? हे सगळं चित्रण आमच्या या ४५ मिनिटांच्या चित्रपटात बघायला मिळेल.

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील या चित्रपटाच्या  निर्मिती मध्ये अॅनिमेशन क्षेत्रातील अनुभवी कलाकारा सोबत सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे विद्यार्थी सहभागी आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी मोठा खर्च असून त्यासाठी एका ट्रस्टच्या माध्यमातून  क्राउड फंडिंग (निधी) उभारण्यात येणार आहे, त्यामध्ये नागरिकांनी, सावरकरप्रेमींनी आपले योगदान द्यावे असे आवाहन संतोष रासकर यांनी याप्रसंगी केले.

Share This News

Related Post

Fraud

Fraud News : लष्करात भरती करण्याच्या आमिषाने तरुणांना 29 लाखांचा गंडा

Posted by - June 23, 2023 0
पुणे : पुण्यामधून फसवणुकीचे (Fraud News) एक मोठे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये लष्करी गणवेश घालून मोठ्या अधिकाऱ्यांच्या ओळखी असल्याचे…

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची ऑफर फेटाळली, काँग्रेस पक्षात जाणार नाही

Posted by - April 26, 2022 0
नवी दिल्ली – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर याच्या काँग्रेस प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु होती. त्या चर्चेला आज पूर्ण…
Gulabrao And Eknath Khadse

Jalgaon News : खडसे-गुलाबराव पाटील यांच्यातील ‘तो’ वाद 4 वर्षानंतर अखेर मिटला; काय आहे नेमके प्रकरण?

Posted by - June 27, 2023 0
जळगाव : राजकारणात कोणीच कोणाचा कायम मित्र किंवा शत्रूं नसतो असा प्रत्यय सद्या जळगावच्या (Jalgaon News) राजकारणात येतांना दिसत आहे.…

‘मराठी माथाडी कामगारांवर अन्याय जर होत असेल तर याद राखा..!’ निलेश माझिरे यांचा अधिकाऱ्यांना मनसे स्टाईल इशारा

Posted by - November 9, 2022 0
पुणे : माथाडी कामगारांचे तीन वर्षापासून एका गोडाऊनने पेमेंट थांबवले आहे. माथाडी बोर्डाला वारंवार पत्रव्यवहार करून पण उत्तर मिळाले नाही.…

मोठी बातमी : डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिक आणि शिंदे समर्थक यांच्यात तुफान राडा (VIDEO)

Posted by - August 2, 2022 0
कल्याण : शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत जोरदार राडा झाला आहे. शिवसेना कार्यकर्ते आणि शिंदे समर्थकांमध्ये राडा झाला आहे. शिंदे समर्थक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *