खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण ? वाचा सविस्तर

524 0

ठाणे : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी हल्ला करण्यासाठी ठाण्यातील एका गुंडास सुपारी दिली असल्याचे थेट पत्रच त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले होते. यानंतर आता संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याचा डाव असल्याचा आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे.

दरम्यान संजय राऊत यांच्या विरोधात कापूर बावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राऊत यांनी पत्रात लिहिले होते की, ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर यास माझ्याव हल्ला करण्याची सुपारी श्रीकांत शिंदे यांनी दिली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावर आता ठाणे पोलिसांनी थेट नाशिकमध्ये जाऊन संजय राऊत यांचा जबाब देखील नोंदवून घेतला आहे. संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “सहानुभूती मिळवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेले धमकीचे आरोप हे फक्त कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला स्टंट आहे. याची सखोल चौकशी गृह विभागामार्फत होईल.” असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केला आहे.

Share This News

Related Post

Medha Kulkarni

मेधा कुलकर्णींचं राजकीय पुनर्वसन; राज्यसभेची उमेदवारी जाहीर

Posted by - February 14, 2024 0
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून तीन नावांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि…

एलआयसीचे शेअर बाजारात लिस्टिंग, पण प्री ओपनिंग मध्येच शेअर कोसळला

Posted by - May 17, 2022 0
नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा कंपनी (LIC) आज शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. बीएसईवर एलआयसीचा…
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट; ‘या’ जिल्ह्यात मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस

Posted by - November 11, 2023 0
मुंबई : दिवाळीच्या तोंडावर राज्यात पावसाचे आगमन (Maharashtra Weather Update) झाले आहे. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.…
Accident Video

Accident Video : महामार्गावरील उभ्या ट्रकला भरधाव कारची धडक; 6 जणांचा जागीच मृत्यू

Posted by - September 7, 2023 0
सध्या सोशल मीडियावर तामिळनाडूतील ट्रक आणि कारच्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल (Accident Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा…
SSC-HSC Exam

SSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल, आता ‘हे’ काम होणार ऑनलाईन

Posted by - January 17, 2024 0
मुंबई : दहावी बारावीच्या परीक्षेला (SSC-HSC Exam) पुढील महिन्यापासून सुरुवात होणार आहे. या दरम्यान आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *