#PUNE : प्रणिती शिंदे यांच्या पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

526 0

पुणे : कसबा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा आ.प्रणिती शिंदे यांनी महात्मा फुले वाडा, समाताभूमी येथे वंदन करून सकाळी प्रचार पदयात्रेस प्रारंभ केला. त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस अध्यक्षा विद्या चव्हाण, प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील, प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादीच्या महिला शहर अध्यक्षा मृणाल वाणी, शहर कॉंग्रेस उपाध्यक्ष अजित दरेकर, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमलताई व्यवहारे यांसह विक्रम खन्ना, हेमंत राजभोज, यासिर बागवे, गणेश नलावडे, सारिका पारेख, रत्ना नाईक, वनिता जगताप, सरिता काळे आदी नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

ही पदयात्रा बागवे कमान, महात्मा फुले वाडा, चांदतारा चौक, जोहरा कॉम्प्लेक्स मार्गे सुमित डांगे यांच्या दुकानापाशी समाप्त झाली. जोहरा कॉम्प्लेक्स आणि रामकृष्ण हौसिंग सोसायटी येथे प्रणिती शिंदे यांनी कोपरा सभा घेऊन नागरिकांशी संवाद साधला. रामकृष्ण हौसिंग सोसायटी येथे चर्मकार समाजाने धंगेकर यांना पाठींबा दिला. खडकमाळ आळी येथे लोधी समाजानेदेखील धंगेकर यांना पाठींबा दिला. याप्रसंगी प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मोदी सरकारने महागाई आणि बेकारी आणली, त्यांनी अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकली, कॉंग्रेसच्या नेत्या खा.सोनिया गांधी अन्नसुरक्षा कायदा आणला. प्रत्येक गरिबाला स्वस्त दरात पुरेसे धान्य देण्याची तरतूद केली.

मोदी सरकारने मात्र हे सारे बदलले. त्यामुळेच आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. या पोटनिवडणुकीत सर्वाधिक मतदान करून धंगेकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली. यावेळी उपस्थित ३००-४०० नागरिकांनी उत्स्फुर्तपणे ‘धंगेकर जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या व येथेच पदयात्रा संपली. या पदयात्रेत प्रणिती शिंदे स्वतः घोषणा देत असल्याने सहभागी महिलांनादेखील जोश आला होता.

यानंतर प्रणिती शिंदे यांनी मामलेदार कचेरी जवळील श्री शिवाजी मराठा सोसायटी येथे भेट दिली. तेथील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

Share This News

Related Post

LokSabha

TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट : ‘या’ आहेत देशातील ‘टॉप 10 हाय वोल्टेज’ लढती; दिग्गज नेत्यांपुढे विजयाचं आव्हान

Posted by - March 29, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्यापासून महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच लढतींचा आढावा आपण घेतलेला आहे. मात्र आज आपण देशातल्या टॉप टेन…

MPSC EXAM 2021 RESULT : MPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर ; पुणे केंद्रातून 903 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र

Posted by - August 27, 2022 0
Mpsc मुख्य परीक्षेच्या निकालासंदर्भात महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 चा…
Maharashtra Politics

Maharashtra Politics : पवारांचं टेन्शन वाढलं ! शिवतारेंनंतर आता ‘हा’ नेता लढवणार बारामती लोकसभा

Posted by - March 26, 2024 0
बारामती : बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते विजय शिवतारे हे बारामतीमधून निवडणूक लढवण्यावर (Maharashtra Politics) ठाम…

अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई ; 324 किलो भेसळयुक्त गूळ जप्त

Posted by - September 29, 2022 0
पुणे : अन्न व औषध प्रशासनाने काल (बुधवारी) दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील मे. महाराज गूळ उद्योग उत्पादकाच्या गुऱ्हाळ घरावर छापा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *