“चोर सोडून संन्याशाला फाशी” पुणे मनपाचा अजब कारभार ! मिळकतकर थकबाकीदाराचा फ्लॅट सापडला नाही म्हणून तिसऱ्याचीच सदनिका केली सील

645 0

पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने कर संकलन विभागाच्या मिळकत कर गोळा करण्याच्या साठी वर्षा अखेर म्हणून जोरदार मोहीम राबविण्यात येते आहे. दरम्यान पुणे मनपा मिळकतकर थकबाकीदार मेहता म्हणून आहेत. पण इमारतीमध्ये त्यांचा फ्लॅट सापडला नाही म्हणून काहीही संबंध नसताना इमारतीत राहणारे अरुण घोडके यांची सदनिका सील करण्यात आली. आज या विचित्र प्रकाराने संबंधित व्यक्तीला नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

“चोर सोडून संन्याशाला फाशी” असा अजब पुणे मनपाचा कारभार सामोरा आला आहे. संबंधित माहिती कर संकलन प्रमुख अजित देशमुख यांच्या निदर्शनास राष्ट्रवादी अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांनी आणून दिली. ज्या व्यक्तीच्या सदनिकेचा विनाकारण सील करण्यात आले ते अरुण घोडके हे प्रतिष्ठित व्यापारी असून त्यांना यामुळे नाहक बदनामीला सामोरे जाऊन मनस्ताप सोसळण्याची वेळ आली आहे.

या प्रकरणी तात्काळ संबंधित अधिकरी आणि कर्मचाऱ्यांनी पुन्हा इमारतीमध्ये येऊन शहानिशा केली असता त्यांच्या सदर बाब लक्षात आली आणि त्यानंतर हे सील काढण्यात आले.

Share This News

Related Post

महत्वाची बातमी ! महाराष्ट्र निर्बंधमुक्त, गुढीपाडवा साजरा करा जल्लोषात

Posted by - March 31, 2022 0
मुंबई- राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी. कोरोना संदर्भातील सर्व निर्बंध हटवण्यात आले असून यंदा नागरिकांना गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, ईद जल्लोषात साजरी…

महत्वाची बातमी ! शरद पवार यांना UPA अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव

Posted by - March 29, 2022 0
नवी दिल्ली- दिल्ली येथे राष्ट्रवादी राष्ट्रीय युवक काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडत आहे. या बैठकीला देशभरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी…

दसरा मेळावा शिवतीर्थवर होणार ? मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी

Posted by - September 23, 2022 0
मुंबई : दसरा मेळावा यावरून शिवसेना आणि शिंदे गटाच्या वतीने अर्ज करण्यात आले होते. एखाद्या मैदानावर सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी…

VIDEO : पुण्यात बुलेट रॅलीद्वारा राष्ट्रीय एकताचा संदेश ! एक हजार सुरक्षा आणि अग्निशमन अधिकाऱ्यांचा रॅलीत सहभाग

Posted by - August 12, 2022 0
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्त्सवनिमित्त राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत पुणे महापालिका ते अग्निशमन दल मुख्यालयापर्यंत सुरक्षा विभागाचे अधिकारी,…

#NITESH RANE : “…तर दीपक केसरकर यांना निवडून आणणे आमची जबाबदारी असेल !”

Posted by - March 11, 2023 0
कणकवली : राज्यात भाजप शिवसेनेची युती असल्याने भविष्यात २०२४ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील एक मतदार संघ सेनेच्या वाट्याला गेला तर विद्यमान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *