मंत्रिमंडळ बैठक निर्णय : राज्यातील 846 शाळांचा पीएम श्री योजनेत सर्वांगीण विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

570 0

मंत्रिमंडळ बैठक निर्णय : राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

देशभरात पहिल्या टप्प्यात १५ हजाराहून अधिक शाळा उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून विकसित करण्यात येणार असून यात राज्यातील ८४६ शाळांचा समावेश करण्यात येईल.

पीएम श्री योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाने केंद्रासमवेत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० राज्यात लागू करण्यात येईल. पीएम श्री योजनेत केंद्राचा ६० टक्के हिस्सा असेल. प्रत्येक शाळेसाठी १ कोटी ८८ लाख एवढी तरतूद ५ वर्षांसाठी करण्यात येईल. या शाळांसाठी ५ वर्षांकरिता केंद्राचा हिस्सा ९५५ कोटी ९८ लाख राहणार असून राज्याचा ४० टक्के हिस्सा प्रती शाळा ७५ लाख प्रमाणे ६३४ कोटी ५० लाख खर्च अपेक्षित आहे. या योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ४०८ गट, २८ महानगरपालिका आणि ३८३ नगरपालिका व नगरपरिषदा यामधून पीएम श्री शाळांची निवड केली जाईल.

या शाळांमधून अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देण्यात येईल. विद्यार्थ्यांची वैचारिक समज आणि वास्तविक जीवनातील त्याचा ज्ञानाचा वापर आणि योग्यतेवर आधारित मुल्यांकन करण्यात येईल. या शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांना देखील सहभागी करून घेऊन विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व शैक्षणिक मदत करण्यात येईल. काही कारणांमुळे विद्यार्थ्यांची शाळेतून गळती झाल्यास त्यांना पुन्हा प्रवेश देऊन अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यात येईल.
या शाळांचा विकास प्रामुख्याने पुढील ६ प्रमुख आधार स्तंभांवर केला जाईल. अभ्यासक्रम, आध्यापन शास्त्र व मुल्यमापन; प्रवेश आणि पायाभूत सुविधा; मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व; समावेशक पद्धती आणि लाभार्थी समाधान; व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन; लाभार्थी समाधान.

या योजनेची अंमलबजावणी राज्य स्तरावरून शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती, जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती आणि महापालिका स्तरावर महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समित्यांमार्फत केली जाईल. राज्य प्रकल्प संचालक हे राज्य अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष असतील.

Share This News

Related Post

विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडी ठरली होती; शिंदे गटातील नेत्याचं खबळबळजनक विधान

Posted by - December 25, 2022 0
पुणे: राज्यात अभूतपूर्व सत्तांतर होऊन आता तीन महिने लोटल्यानंतर शिंदे गटातील एका नेत्याचा विधान चांगलंच चर्चेत आलं असून या विधानामुळे…
Yash Mahale

Yash Mahale : जळगाव हळहळलं ! देशाने भावी लेफ्टनंट कर्नल गमावला; यश महालेचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - October 20, 2023 0
जळगाव : जळगावमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. सैन्य प्रशिक्षण घेत असताना जखमी झालेल्या भावी लेफ्टनंट कर्नलचा (Yash Mahale)…

खुनाच्या आरोपाखाली जामिनावर बाहेर आलेल्या गुन्हेगारावर ‘मर्डरचा रिप्लाय मर्डर’ असे म्हणत कोयत्याने वार

Posted by - March 30, 2023 0
पुण्यात कोयता गँगवर पोलिसांनी धडक कारवाई केलेली असली तरी पुण्यात अजूनही कोयता गँगची दहशत कमी झालेली नाही. हडपसर भागामध्ये दोन…

तुम्हीही चहाप्रेमी आहात का ? पण दिवसभरात किती चहा प्यावा हे देखील जाणून घ्या ! अन्यथा शरीरावर होतील घातक परिणाम…

Posted by - February 21, 2023 0
चहा हे भारतीयांचे सर्वात आवडते पेय आहे. असे अगदी बोटावर मोजण्याइतकेच लोक असावेत की ज्यांना चहा आवडत नाही. तर अनेकजण…
Jalna Crime

Jalna Crime : पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा कारमध्ये होरपळून मृत्यू; जालनामधील घटना

Posted by - June 23, 2023 0
जालना : जालनामध्ये (Jalna Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कारच्या एका भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *