#DHULE : काजू समजून खाल्ल्या चंद्रज्योतच्या विषारी बिया; धुळ्यात 7 चिमुरड्यांना विषबाधा

930 0

धुळे : काजू समजून चंद्रज्योती या फळाच्या बिया खाल्ल्यामुळे 7 मुलांची प्रकृती अस्वस्थ झाल्याची घटना काल धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात घडली आहे. काजू समजून चंद्रज्योतच्या बिया खाल्ल्यामुळे 7 चिमुरड्यांची प्रकृती बिघडली आहे. धुळे तालुक्यातील बोरकुंड गावातील आदिवासी वस्तीत लहान बालकांनी खेळता खेळता काजू समजून चंद्रज्योतच्या बिया खाल्ल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. विषबाधा झालेल्या सर्व चिमुरड्यांना शासकिय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात साध्य उपचार सुरु आहेत.

आपल्या घरा जवळ खेळत असताना मुलांनी चंद्रज्योतच्या झाडाखाली पडलेल्या बिया दिसल्या खेळता खेळता काजू समजून मुलांनी या विषारी बिया खाल्ल्या मात्र काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागला. मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला. मुलांची प्रकृती खालावल्याने पालकांनी त्यांना तातडीने शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं.

यातील एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर 6 मुलं बेशुद्ध झाली असून त्यांच्यावर सध्या बाल रुग्णालयात उपचार सुरु आहेत, त्यांनी प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र त्यांना देखील त्रास होत असल्याने त्यांना 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Share This News

Related Post

पुणे : चांदणी चौक येथील वाहतूक १० ऑक्टोबरपासून काम पूर्ण होईपर्यंत रोज रात्री ‘या’ वेळेत राहणार बंद

Posted by - October 10, 2022 0
पुणे : मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील एनडीए चौकातील (चांदणी चौक) दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यासाठी व नवीन पुलाच्या कामासाठी खडक फोडण्याचे काम…
Pandharpur News

Pandharpur News : मुलाच्या हळदीत नाचताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू; मृत्यूचे कारण ऐकून बसेल धक्का

Posted by - January 2, 2024 0
पंढरपूर : पंढरपूरमधून (Pandharpur News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये मुलाच्या लग्नाच्या वरातीमध्ये नाचताना बापाचा दुर्दैवी…
Nashik News

Nashik News : भाविकांना शिर्डीहून सप्तशृंगी गडावर घेवून जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग

Posted by - May 21, 2024 0
नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक भीषण घटना समोर आली आहे. यामध्ये शिर्डी येथून भाविकांना घेवून सप्तशृंगी गडाकडे दर्शनासाठी जाणाऱ्या…

उदय सामंत हल्लाप्रकरणी सहा शिवसैनिकांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

Posted by - August 7, 2022 0
पुणे: शिंदे गटातील आमदार आमदार आणि माजी माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी सहा शिवसैनिकांना पुण्यातील…

शैक्षणिक बातमी : शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांसह वह्या देखील मिळणार मोफत

Posted by - November 7, 2022 0
शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबत विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं देखील कमी करण्यासाठी सध्या शिक्षण खातं काही योजनांचा विचार करते आहे. त्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *