#PUNE CRIME : मालामाल होण्याच्या नादात पुण्यातील 250 हून अधिक लोकांची 6 कोटी रुपयांची फसवणूक; म्हणे नासा आणि इस्रोमध्ये…

959 0

पुणे : पुण्यातील 250 हून अधिक नागरिकांची सहा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. चार जणांच्या टोळक्याने पुणेकरांना कोट्यावधीचा गंडा घातलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन परिसरात एका हॉटेलमध्ये चार जणांनी गुंतवणूकदारांसाठी बैठक बोलावली होती. यात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या संशोधन संस्था नासा मधील लोक भारतात येणार असून यावेळी शास्त्रज्ञ राईस पुलर या यंत्रावर संशोधन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

राईस पुलर या धातूच्या भांड्याला संपूर्ण जगात मागणी असल्यामुळे पुणेकरांनी एक लाख रुपये यामध्ये गुंतवले होते. यावरून या सर्वांना एक कोटींचा परतावा मिळेल अशी बतावणी या टोळक्याने केली होती. तसेच बनावट कागदपत्र तयार करून या नागरिकांकडून पैसे देखील जमा करून घेण्यात आले होते.

या चार भामट्यांच्या विरोधात बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर या चौघांचा आता तपास सुरू आहे.

Share This News

Related Post

‘….. नाहीतर तुम्हाला महाग जाईल’, पोलिसांना दम भरणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

Posted by - April 12, 2023 0
गाडीला काळ्या काचा लावून पोलिसांना दमबाजी करणार्‍या तरुणाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. चौकशी केल्यावर तो तोतया पोलीस असल्याचे निष्पन…
Pune News

Pune News : पुण्यातील आणखी एका पबवर छापा; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Posted by - May 26, 2024 0
पुणे : एका पोर्शे कारनं दुचाकीवर असणाऱ्या तरुण, तरुणीला चिरडल्याची घटना (Pune News) घडली होती. हा अपघात गेल्या रविवारी पुण्यातील…
Mountaineering Institute

Mountaineering Institute : राज्यात होणार स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्यूट खा. अमोल कोल्हेंची ट्विटरद्वारे माहिती

Posted by - June 20, 2023 0
पुणे : आता आपल्या महाराष्ट्रात पर्वतारोहणसारखे साहसी खेळ शिकवणारी स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्यूट (Mountaineering Institute) सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे…

पुण्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान पालिका अधिकाऱ्यावर हल्ला, जेसीबीवर दगडफेक

Posted by - March 29, 2022 0
पुणे- पुण्यात धानोरी भागात अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर संतप्त नागरिकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

उन्हाळी कांद्याची आवक वाढल्याने दर कोसळले

Posted by - March 18, 2022 0
राज्यातील अनेक भागांत उन्हाळी कांदा आता अंतिम टप्प्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. यामध्ये नाशि,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *