#SATYAJEET TAMBE : ” ज्या पक्षांमध्ये आयुष्यभर राहिलो, त्या पक्षाला लोकांसमोर वाईट करू नये, म्हणून खरं तर बोललो नाही , वेळ आल्यावर…! “

626 0

नाशिक : आज नाशिक पदवीधर निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू आहे. याच दरम्यान सत्यजीत तांबे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. सत्यजित तांबे यावेळी म्हणले कि, ” मी तर अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्ष राहील. याच्यापेक्षा जास्त कुठलेही राजकीय भाष्य आजच्या तारखेला करणार नाही. लवकरच जे मागचे दहा पंधरा दिवसांमध्ये राजकारण झालं. ज्याच्यातून परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. याच्यावर जे अर्धसत्य ठेवून ज्या पद्धतीने एकच बाजू मांडली गेली. त्यामुळेच मुद्दाम कुठली प्रतिक्रिया दिली नाही. कारण शब्दाने शब्द वाढू नये आपण ज्या पक्षांमध्ये आयुष्यभर राहिलो. त्या पक्षाला अजून लोकांसमोर वाईट करू नये, म्हणून खरं तर बोललो नाही. वेळ आल्यावर या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणार असल्याचे सत्यजित तांबे म्हणाले आहेत.

नाशिक पदवीधर निवडणूक एकतर्फी असून सगळ्याच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. ही सर्व मंडळी पक्षीय भेदाभेद विसरून सोबत आहे. त्याचं कारण म्हणजे, निवडणुकीपुरतं फक्त राजकारण करत असतो. निवडणूक झाल्यानंतर परिवारानं नियम कायम पाळलेला आहे. आम्ही सातत्याने सामान्य लोकांच्या कामासाठी राबत असतो. कधी त्याच्यामध्ये पक्षीय भेदाभेद ठेवत नाही. त्यामुळे सर्व लोक जे आहेत. ते प्रेमाने मनापासून सोबत काम करताना आपल्याला दिसत आहेत. 100 पेक्षा जास्त संघटनांनी पाठिंबा दिलेला असून टीडीएफ शिक्षक भारतीसह अनेक संघटना आहेत. असेही यावेळी तांबे म्हणले आहेत.

Share This News

Related Post

Eknath Shinde Sad

Kunbi Certificate : सरसकट कुणबी प्रमाणपत्रांची मागणी मंत्रिमंडळाला अमान्य; एकनाथ शिंदेंनी केले स्पष्ट

Posted by - November 1, 2023 0
मुंबई : राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्याची मनोज जरांगे यांची मागणी कायद्याच्या चौकटीत न टिकणारी असून अशी…

गडकिल्ले, पर्यटनस्थळ परिसरात १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

Posted by - July 13, 2022 0
पुणे : हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता फौजदारी दंड संहितेच्या…

Bharat Ratna Award : पी.व्ही. नरसिंहराव, डॉ. एम.एस. स्वामिनाथन आणि चौधरी चरण सिंह यांना ‘भारतरत्न’ जाहीर

Posted by - February 9, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि कृषीतज्ज्ञ डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांना…

3 हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

Posted by - December 8, 2022 0
मुंबई : तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी…
Sangli

रुग्णालयात दाखल पत्नीला पाहून घरी परतत असताना पतीचा अपघातात मृत्यू

Posted by - June 3, 2023 0
सांगली : सांगलीमध्ये (Sangli) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये रुग्णालयातील पत्नीला पाहून घरी परतत असताना पतीचा वाटेतच मृत्यू झाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *