सावधान…! गॅस गिझरच्या दुर्घटना रोखण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या

93 0

गेल्या काही दिवसांपासून गॅस गिझरमुळे गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नाशिकमध्ये एका महिला वैमानिकाचा गुदमरून मृत्यू घडल्याची ताजी घटना घडली आहे. त्यामुळे गॅस गिझर वापरताना प्रत्येकाने नेमकी काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती घेऊ या.

बाजारात अनेक प्रकारचे इलेक्ट्रिक व गॅस गिझर उपलब्ध आहेत. मात्र, सध्या गॅस गिझरची मागणी अधिक आहे. गॅस गिझर हा इलेक्ट्रिक गिझरपेक्षा वेगळा असतो. ते LPG वर चालते आणि पाणी गरम करतो. टाकीच्या तळाशी एक बर्नर असते. मात्र गरम पाणी पाईपद्वारे पोहोचते. इलेक्ट्रिक गिझरपेक्षा गॅस गिझर स्वस्त देखील असतो. हा वापरण्यास देखील खूप सोपा आहे. याच कारणामुळे बरेच लोक गॅस गिझर खरेदी करतात.

बंदिस्त जागेत गॅस गिझर कधीही लावू नका. गळती किंवा इतर कोणतीही समस्या असल्यास गॅस बाहेर पडण्याची शक्यता असते. बाथरूम, स्वयंपाकघर सारख्या ठिकाणी गॅस गिझर असेल तर त्या जागेतील व्हेंटिलेटर कायम खुला ठेवावा. जेणेकरून गॅसला बाहेर जाण्याची वाट मिळेल.

दिवसभर गॅस गिझरचा वापर करणे योग्य नाही. निष्काळजीपणे वापर केल्यास धोका निर्माण होतो. गॅस गिझरमुळे कोणाला समस्या आल्यास, शक्य तितक्या लवकर मोकळ्या जागेत जा. जेणेकरून श्वास घेण्यास त्रास होणार नाही. बाथरूममध्ये आंघोळ सुरू करण्यापूर्वी गॅस गिझर बंद करा. त्यामुळे आंघोळ करताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.

गॅस गिझरमध्ये गळती झाल्यास त्यातून कार्बन मोनोऑक्साइड वायू बाहेर पडतो. यामुळे चक्कर येणे, मळमळ, उलट्या, थकवा आणि पोटदुखी होऊ शकते. तसेच श्वास घेण्यास त्रास होणे या यासारख्या समस्या देखील निर्माण होतात. आंघोळ करताना किंवा नंतर अशी कोणतीही समस्या तुम्हाला दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जा.

Share This News

Related Post

Sahil Khan

Sahil Khan : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानला अटक

Posted by - April 28, 2024 0
मुंबई : महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांनी नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रसिद्ध अभिनेता…

मनाची आंघोळ : नात्यांमध्ये दुरावा येतोय…? फक्त प्रेम नाही तर ‘ही’ भावना देखील आहे महत्त्वाची…

Posted by - August 12, 2022 0
मनाची आंघोळ : नातेसंबंध कोणतेही असो त्यामध्ये दुरावा येणं हे क्लेशदायक असतं मग कारण कोणतेही असो मतप्रवाह विरुद्ध असणे स्वभाव…
Rituraj Singh

Rituraj Singh : ‘अनुपमा’ फेम ऋतुराज सिंह यांचे हार्ट अटॅकने निधन

Posted by - February 20, 2024 0
मुंबई : बॉलीवूड विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूड तसेच हॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज के सिंह (Rituraj…

पर्यटकांसाठी खुशखबर..! सिंहगड ई -बस ट्रायलच्या फेऱ्यात

Posted by - March 15, 2022 0
ऑक्‍टोबर महिन्यापासून सिंहगडावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सिंहगडावर ई-बसेस सुरू करणे मागील काही महिन्यांपासून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *