पुणे विद्यापीठाच्या आवारात फिरायला जाताय? मग ही आहे तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी 

325 0

तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात फिरायला जात असाल तर तुम्हाला आता फिरण्यासाठी, व्यायामासाठी नावनोंदणी करावी लागणार आहे. या माध्यमातून विद्यापीठाच्या आवारात येणाऱ्या नागरिकांची मूलभूत माहिती विद्यापीठ प्रशासन संकलित करणार आहे.

विद्यापीठ आवाराच्या आणि तिथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यापीठात सकाळी आणि संध्याकाळी व्यायाम आणि फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
ही नोंदणी विनामूल्य असून नोंदणीसाठी विद्यार्थी सुविधा केंद्राजवळील सुरक्षा केबिनमध्ये आणि सुरक्षा विभागात डेस्क ठेवून स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
या डेस्कवर नोंदणी अर्ज ठेवला असून तो भरून नागरिकांना त्याठिकाणी जमा करायचा आहे.
ही नोंदणी 28 जानेवारीपर्यंत करण्यात येणार आहे.
नोंदणीधारकांना बायोमेट्रिक प्रवेश देणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

औंध, रेंजहिल्स, सांगवी, पाषाण रस्ता, मॉडेल कॉलनी या भागातून दररोज सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. सर्व नागरिकांनी नोंदणी त्वरित करून घ्यावी जेणेकरून पुढील गैरसोय होणार नाही , असं आवाहन विद्यापीठान केलं आहे.

Share This News

Related Post

म्हणून…. राहुल गांधींनी धरला पूनम कौरचा हात

Posted by - October 30, 2022 0
तेलंगणा: काँग्रेस नेते राहुल गांधी एका अभिनेत्रीचा हातात हात धरून चालताना दिसल्यामुळं सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो…
Mamata Banerjee

Mamata Banerjee : इंडिया आघाडीला मोठा धक्का ! ममता बॅनर्जी स्वबळावर लढणार निवडणूक

Posted by - January 24, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला (Mamata Banerjee) मोठा…

इस्त्रोचा बाहुबली मध्यरात्रीच अवकाशात झेपावला

Posted by - October 23, 2022 0
नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने (ISRO) ने शनिवारी रात्री 12:07 वाजता आपल्या सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण…

केंद्रीय नागरी विमान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते मल्टीलेवल पार्किंगचे उद्घाटन : खासदार गिरीश बापट

Posted by - November 23, 2022 0
पुणे : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधियाजी यांच्या हस्ते पुणे विमानतळावरील मल्टीलेवल पार्किंगचे दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी…
Pune News

Ajit Pawar : कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका ; मावळात ‘धनुष्यबाण’च चालवा : अजित पवार

Posted by - April 8, 2024 0
पुणे : कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ‘धनुष्यबाण एके धनुष्यबाण’च चालवावे, अशा स्पष्ट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *