कोरोना आटोक्यात येतोय ! देशात कोरोनाचे एक लाखांपेक्षा कमी रुग्ण, 895 जणांचा मृत्यू

113 0

नवी दिल्ली- सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे देशात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र असलेली कोरोनाची तिसरी लाट आता ओसरताना पाहायला मिळत आहे. जवळपास महिनाभरानंतर प्रथमच आज कोरोनाचे नवीन रुग्ण एक लाखांपेक्षा कमी आढळून आले आहेत.

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 83 हजार 876 नवे रुग्ण आढळले असून 895 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाख 99 हजार 54 लोक बरे झाले आहेत. यासह, कोरोनाचा सकारात्मकता दर आता 7.25 टक्क्यांवर आला आहे.

कोरोनाचे नवे रुग्ण आल्यानंतर आता देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 11 लाख 8 हजार 938 वर गेली आहे, तर आतापर्यंत एकूण 5 लाख 2 हजार 874 जणांना या साथीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये घट होत असताना आतापर्यंत 169 कोटींचे लसीकरण करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे 9 हजार 666 नवे रुग्ण

रविवारी महाराष्ट्रात आणखी 9 हजार 666 रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले असून, एकूण संसर्गाची संख्या 78 लाख 3 हजार 700 झाली आहे, तर 66 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 1 लाख 43 हजार 74 वर पोहोचली आहे. एका दिवसात एकूण 25 हजार 175 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, या आजारातून बरे झालेल्यांची संख्या 75 लाख 38 हजार 611 झाली आहे. आता राज्यात 1 लाख 18 हजार 76 रुग्ण कोविड 19 वर उपचार घेत आहेत. रविवारी राज्यात ओमैयक्रॉन प्रकाराच्या संसर्गाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. आतापर्यंत 3 हजार 334 रुग्णांना या ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. मुंबईत कोरोनाचे 536 नवीन रुग्ण आढळले असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला. यासह, कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 10 लाख 50 हजार 455 आणि मृतांची संख्या 16 हजार 661 वर पोहोचली आहे.

Share This News

Related Post

Beed News

Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादीचं पक्ष कार्यालय पेटवलं

Posted by - October 30, 2023 0
बीड : सध्या मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील राजकारण पेटले आहे. मराठा समाजाकडून आता उद्रेक पाहायला मिळत आहे. माजलगावमध्ये ठिकठिकाणी…
Sharad Pawar Speak

Sharad Pawar : ‘नवरा जर रुबाब करत असेल तर..’ शरद पवारांनी महिलांना दिला ‘हा’ सल्ला

Posted by - January 20, 2024 0
सोलापूर : आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जाताना दिसत आहेत. कर्तृत्वावर घर चालवण्यात महिला आघाडीवर आहेत. आमच्या काळात आम्ही…

महामेट्रोकडून पुण्यात नवीन सात मार्ग प्रस्तावित, कोणते आहेत हे नवीन मार्ग ?

Posted by - February 11, 2022 0
पुणे- पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने एल अॅण्ड टी कंपनीकडून तयार करून घेतलेल्या ‘ सर्वंकष वाहतूक आराखड्यात सुमारे १९५.२६ किलोमीटर…

मोठी बातमी! शिवसेना आमदार सदा सरवणकर राज ठाकरेंच्या भेटीला

Posted by - July 6, 2022 0
मुंबई: अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता…
Poisoning

Poisoning : धक्कादायक ! सांगलीच्या आश्रमशाळेमध्ये जेवणातून 170 मुलांना विषबाधा

Posted by - August 28, 2023 0
सांगली : सांगलीच्या जत तालुक्यातल्या उमदी येथील आश्रम शाळेतील मुलांना विषबाधा (Poisoning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे 170…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *