बेकायदा होर्डिंग्जवर महापालिकेची कारवाई, अद्यापही 1300 अनधिकृत होर्डिंग्जचा वापर

614 0

पुणे : शहरातले चौक, रस्ते होर्डिंगने गजबजलेले आहेत तरीही वर्षानुवर्षे पुणे महापालिका त्यावर कारवाई करत नव्हती. आता शहराचे विद्रुपीकरण थांबण्यासाठी कारवाईचा बडगा उगारत महापालिकेने नऊ महिन्यात 642 होर्डिंग जमीनदोस्त केले आहेत. तरीही शहरात अद्याप 1 हजार 300 अनधिकृत होर्डिंग्जचा वापर सुरू आहे.

शहराला अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स, जाहिरातींचा विळखा बसला आहे. पुणे महापालिकेने 2018 ते 2022 या चार वर्षात एकूण 1343 होर्डिंग्ज काढून टाकले पण तरीही अजून अनधिकृत होर्डिंग्जचा वापर सुरूच आहे.
राजकीय, जाहिरात आणि वेगवेगळ्या विषयांचे बॅनर जागोजागी दिसतात. बहुतांश बॅनर हे अनधिकृत असतात.

महापालिकेकडून बॅनर लावायला परवानगी दिली जाते पण अनेकदा परवानगी न घेताच ते लावले जातात. अशावेळी महापालिकेचा महसूलही बुडतो. म्हणून महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात येते.

अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई केल्यानंतर 50 हजार रुपयांचा दंड जाहिरात फलकधारकांकडून वसूल करण्यात येतो.  पुणे महापालिकेने 2022 या वर्षात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यात 642 होर्डिंग्जवर कारवाई केली.
त्यातील अवघ्या 25 होर्डिंगधारकांकडून दंड वसूल केला. अद्याप 2 कोटी 52 लाखांचा दंड वसूल करणं बाकी आहे.

शहरातील हे अनधिकृत होर्डिंग्ज वाहतुकीला अडथळा ठरतात. काही ठिकाणी सिग्नल यंत्रणा या होर्डिंग्जमुळे झाकली जाते. शहरात 2 हजार 311 अधिकृत होर्डिंग्ज आहेत तर बाकी अनधिकृत आहेत.

Share This News

Related Post

State level cycle competition : ग्रामीण भागातून गुणवत्तापूर्ण खेळाडू घडणे आवश्यक : दिलीप वळसे-पाटील

Posted by - July 23, 2022 0
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार वाडा येथे…

पुणे : तळजाई पठारावरील पस्तीस हजार संघस्वयंसेवकांच्या शिबिराला चाळीस वर्षे पूर्ण

Posted by - January 13, 2023 0
पुणे : पुण्यातील तळजाई टेकडीच्या पठारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भरवलेल्या ‘प्रांतिक शिबिरा’ला शनिवारी (१४ जानेवारी) चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत.…

Maharashtra Politics : शिवसेनेचे खासदार-आमदार शिंदे गटात, परंतु कार्यकर्ते पक्षप्रमुखांबरोबर

Posted by - July 23, 2022 0
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दोन आमदार आणि एक खासदार त्यांच्या गोटात गेल्यानंतरही शिवसेनेचे पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिक मात्र अजूनही शिवसेनेतच…
Sharad Pawar

Maharashtra Politics : शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; भाजपचा ‘हा’ मोठा नेता करणार राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश

Posted by - April 11, 2024 0
पुणे : सगळीकडे लोकसभेची धामधूम सुरु असताना आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपला…

समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - December 9, 2022 0
मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *