…आणखी संपन्न, समृद्ध महाराष्ट्रासाठी एकजूट होऊया; मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

141 0

मुंबई: – नवीन वर्ष नव्या आशा-आकांक्षा घेऊन येते, नव संकल्पनांची प्रेरणा देते. येणारे 2023 हे नववर्ष आशा-आकांक्षा सत्यात आणणारे, नवसंकल्पना साकारण्यासाठी बळ देणारे ठरेल. आपला महाराष्ट्र कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांच्या संकल्पनांवर, त्यांच्या मेहनतीवर उभा आहे. आगामी वर्षातही अशाच नवसंकल्पना साकारण्यासाठी आणि त्यातून आपला महाराष्ट्र आणखी संपन्न, समृद्ध करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करुया, या विश्वासासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, सरते वर्ष खूप काही शिकवून जाते. तर नवीन वर्ष आपल्या मनात नव्या आशा-आकांक्षा निर्माण करते. यातून नव्या संकल्पना राबवण्याची प्रेरणा मिळते. आपल्या आधुनिक महाराष्ट्राची उभारणी अशा संकल्पनाच्या जोरावर शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या मेहनतीतून झाली आहे. आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. महाराष्ट्र देशातील उद्योग-व्यापार, कृषी, शिक्षण अशा सर्वच क्षेत्राचे नेतृत्व करत आहे. देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ महाराष्ट्र आहे. गत दोन वर्षात अनेक संकटं, अडचणी आल्या. या सगळ्याचे मळभ दूर करत आता आपण नव्या दमानं वाटचाल सुरु केली आहे. ही वाटचाल आपला आत्मविश्वास वाढवणारी आहे. हाच आत्मविश्वास घेऊन आपला महाराष्ट्र आणखी संपन्न, समृद्ध व्हावा यासाठी प्रय़त्न करूया. त्यासाठी आपल्या सर्वांची एकजूट करूया. नवे वर्ष सर्वांच्या आकांक्षा पूर्ण करणारे ठरावे. नवे वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात उत्तम आरोग्याचे आणि संपन्नतेचे पर्व घेऊन येवो, अशी मनोकामना व्यक्त करून मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांना नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Share This News

Related Post

Rashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट

Posted by - September 8, 2023 0
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाकडून रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध…

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा आजच शपथविधी होणार

Posted by - June 30, 2022 0
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकारला सुरूंग लागवल्याने गेले आठ-दिवस महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून…

लग्नसमारंभात नवऱ्या मुलाला भेट दिले लिंबू ; फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Posted by - April 17, 2022 0
गगनाला भिडलेल्या महागाईच्या काळात लिंबाच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांची चव ‘आंबट’ करत आहेत. लिंबाच्या दरात वाढ झाल्याने देशाच्या अनेक भागांत लिंबू …
Pratik Patil

Pratik Patil : प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला; सांगलीत आघाडीचं गणित बिघडणार?

Posted by - April 10, 2024 0
सांगलीतून बंडखोरी करण्याच्या विचारात असलेले काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांचे बंधू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील (Pratik Patil) यांनी…
Pune News

Pune News : पुण्यातील शिवाजीनगर परिसरात दुधाच्या टॅंकरचा अपघात; चालक जखमी

Posted by - August 5, 2023 0
पुणे : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. पुणे जिल्ह्यातील (Pune News) शिवाजीनगर परिसरात आज सकाळी राहुल टॉकीज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *